Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

Cricket: स्पर्धेचे उद्घाटन मॅकमन कन्व्हेइंग अँड इंजिनिअरिंग प्रा.लि.चे मुख्यकार्यकारी अधिकारी सुमन जीत पंकज यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीसीसीआयचे सामना रेफ्री श्रीकांत जाधव यांच्या हस्ते होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2026 | 09:45 PM
Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
Follow Us
Follow Us:
  • ‘रायझिंग स्टार करंडक‌’ टी-ट्वेन्टी क्रिकेट २ ऑक्टोबरपासून
  • देशभरातील दिग्गज्‌‍ होणार सहभागी
  • येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌‍स ॲकॅडमी येथे स्पर्धा 
पुणे/Cricket: रायझिंग स्टार स्पोर्ट्‌‍स तर्फे ‌‘रायझिंग स्टार करंडक‌’ प्रौढ गटाच्या (५० वर्षावरील) टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा २ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत येवलेवाडी येथील (Pune) ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌‍स ॲकॅडमी येथे होणार आहे. स्पर्धेत एकूण सव्वा लाखांहून अधिक रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

युवा खेळाडुंसाठी शैक्षणिक पर्वणीच
स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना, स्पर्धेचे संयोजक आणि संचालक सतिश सराफ, अजय सैनीस आणि नितीन सामल यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यामध्ये क्रिकेटची ऐतिहासिक परंपरा असून, जिल्ह्याने अनेक गुणवान खेळाडू महाराष्ट्राला आणि देशाला दिले आहेत. या सर्व खेळाडूंना घडविणाऱ्या वरिष्ठ प्रशिक्षक आणि मार्गदर्शक यांचा समावेश या स्पर्धेमध्ये आहे. हे सर्व ५० वर्षांवरील खेळाडूंचा खेळ बघणे म्हणजे युवा आणि क्रिकेटचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंसाठी एक शैक्षणिक पर्वणीच ठरणार आहे.

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

सामने साखळी आणि बाद फेरीत
गुलाबी चेंडूवर होणाऱ्या या स्पर्धेत साखळी आणि बाद फेरीचे सामने होणार आहेत. स्पर्धेत एकूण चार निमंत्रित संघ झुंझणार आहे. विश्वजीत नायक यांच्या मालकीचा ‌‘रायझिंग स्टार रेड‌’ संघ, प्रवीण गुंदेचा यांच्या मालकीचा ‌‘रायझिंग स्टार ऑरेंज‌’ संघ, अच्युत मालकर यांच्या मालकीचा ‌‘रायझिंग स्टार यलो‌’ संघ, सनल गोविंद यांच्या मालकीचा ‌‘रायझिंग स्टार ब्ल्यु‌’ संघ या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस असणार आहे.

मान्यवर खेळाडू व प्रशिक्षकांचा सहभाग
बंगलोरचे अजय सैनीस आणि विश्वजीत नायक, नितेश वाघेला, वाहिद एस., कोलकाताचे राजीब मुखर्जी, विदर्भचे मकरंद कुलकर्णी, महाराष्ट्राचे प्रवीण गुंदेचा आणि नितीन सामल, जम्मु-काश्मिरचे सतीश सराफ, मध्यप्रदेशचे अच्युत मालाकर आणि चैन्नईचे सनल गोविंद असे नामांकित माजी रणजीपटू आणि जेष्ठ प्रशिक्षक-खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन मॅकमन कन्व्हेइंग अँड इंजिनिअरिंग प्रा.लि.चे मुख्यकार्यकारी अधिकारी सुमन जीत पंकज यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीसीसीआयचे सामना रेफ्री श्रीकांत जाधव यांच्या हस्ते होणार आहे.

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात

Web Title: Rising star t20 cricket league in pune 50 plus peoples can participate sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Sports News
  • T20 cricket

संबंधित बातम्या

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
1

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
2

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश
3

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
4

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.