Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

NCC: देशातील एनसीसी छात्रांची संख्या गेल्या १२ वर्षांत १३ लाखांवरून २० लाखांपर्यंत पोहोचली आहे. महिला छात्रांना अधिकाधिक संधी देण्यावरही भर दिला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2026 | 07:10 PM
Pune NCC traning

Pune NCC traning

Follow Us
Follow Us:
  • ड्रोनपासून सायबर सुरक्षेपर्यंत, ‘एनसीसी’चे प्रशिक्षण आधुनिकतेकडे
  • कवायतीपेक्षा कौशल्य आणि रोजगारक्षमतेवर भर
  • महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांची माहिती
सुनयना सोनवणे / पुणे: भविष्यातील तंत्रज्ञानाधारित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रशिक्षणात आधुनिक कौशल्यांचा समावेश करण्यात येत आहे. छात्रांना नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मान्यताप्राप्त ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे दिले जात आहेत. याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन, नेतृत्व, व्यक्तिमत्त्व विकास, चिकित्सक विचार आणि सामाजिक बांधिलकीवरही भर दिला जात असून, छात्रांना जबाबदार नागरिकांसोबतच भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी बुधवारी दिली.

पुणे एनसीसी ग्रुप मुख्यालयाच्या भेटीदरम्यान त्यांनी विविध उपक्रम आणि प्रशिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षण शिबिरातील छात्रांशी संवाद साधताना लेफ्टनंट जनरल वत्स यांनी शिस्त, नेतृत्व, निःस्वार्थ सेवा आणि जबाबदार नागरिकत्व ही मूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.

Kaveri Engine Russia: भारताच्या स्वदेशी ‘कावेरी’ इंजिनचा रशियात थरार; चाचणीत मिळवला तब्बल 48.5 kN थ्रस्ट अन् जोरात शक्ती प्रदर्शन

बदलत्या तंत्रज्ञानामुळे भविष्यातील गरजाही बदलत आहेत. त्यामुळे पारंपरिक लष्करी प्रशिक्षणासोबत आधुनिक कौशल्ये देणे आवश्यक असल्याचे वत्स यांनी स्पष्ट केले. शेती, वाहतूक, संरक्षण यांसह अनेक क्षेत्रांत ड्रोनचा वापर वाढणार असल्याने छात्रांना त्यासंबंधी प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी’ (एनआयएलईटी) यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या कौशल्यांमुळे छात्रांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्याबरोबरच रोजगारक्षमतेतही वाढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

कवायतीसाठी केवळ ३ ते ५ टक्के वेळ 

एनसीसीच्या प्रशिक्षणात कवायतीला दिला जाणारा वेळ एकूण प्रशिक्षणाच्या केवळ तीन ते पाच टक्के आहे. उर्वरित वेळेत लष्करी कौशल्यांसह सामाजिक सेवा, समुदाय विकास, नेतृत्व, व्यक्तिमत्त्व विकास आणि चिकित्सक विचार यावर प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे एनसीसीकडे केवळ शिस्त आणि कवायतीपुरते न पाहता युवकांच्या सर्वांगीण विकासाचे व्यासपीठ म्हणून पाहिले जात असल्याचे वत्स यांनी नमूद केले. ‘नशामुक्त भारत’, ‘क्षयरोगमुक्त भारत’, ‘एक पेड माँ के नाम’ तसेच आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांतून छात्रांना सामाजिक प्रश्नांशी जोडले जात आहे. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेतही एनसीसी छात्रांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१२ वर्षांत छात्रसंख्या १३ वरून २० लाखांवर 

देशातील एनसीसी छात्रांची संख्या गेल्या १२ वर्षांत १३ लाखांवरून २० लाखांपर्यंत पोहोचली आहे. महिला छात्रांना अधिकाधिक संधी देण्यावरही भर दिला जात आहे. एनसीसी सुरू करण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्था प्रतीक्षेत असल्या तरी केवळ विस्तार करण्यापेक्षा उपलब्ध व्यवस्थेचे सक्षमीकरण आणि प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर सध्या भर असल्याचे वत्स यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील एनसीसीच्या महिला छात्रांनी सलग तीन वर्षे पंतप्रधान मेळाव्यात ‘अखिल भारतीय सर्वोत्कृष्ट छात्र’ हा बहुमान मिळविल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

UPSC Answer Key 2026: यूपीएससी एनडीए आणि सीडीएस २ परीक्षेची आन्सर की जाहीर; ‘या’ दिवशी येणार निकाल!

Web Title: Ncc cadets to now receive cyber security lessons along with drone training pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • army
  • Defence Sector
  • Indian Armed Forces
  • pune news

संबंधित बातम्या

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
1

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश
2

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

Kaveri Engine Russia: भारताच्या स्वदेशी ‘कावेरी’ इंजिनचा रशियात थरार; चाचणीत मिळवला तब्बल 48.5 kN थ्रस्ट अन् जोरात शक्ती प्रदर्शन
3

Kaveri Engine Russia: भारताच्या स्वदेशी ‘कावेरी’ इंजिनचा रशियात थरार; चाचणीत मिळवला तब्बल 48.5 kN थ्रस्ट अन् जोरात शक्ती प्रदर्शन

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
4

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.