मुंबई : परळमध्ये असलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये (Manhole) पडून डॉ. अमरापूरकर (Dr. Amrapurkar) यांचा २०१७ साली दुर्दैवी मृत्यू (Dead) झाला होता. त्यामुळे पाणी साचणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्यांवरील ‘मॅनहोल’वर संरक्षक जाळ्याबाबत पालिकेच्या मलनिस्सारण प्रचारण खात्याकडून कार्यवाही सुरु झाली. (Regarding protective netting at ‘manholes’ on sewers) आणि जास्त पाणी तुंबणाऱ्या ठिकाणाच्या मॅनहोलवर दुहेरी जाळ्या बसविण्यास सुरुवात झाली. आजपर्यंत सुमारे दीड हजार मॅनहोलवर दुहेरी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. (Double nets have been installed on about one and a half thousand manholes) यापुढे देखील नव्याने पाणी तुंबण्याची आणि धोकादायक ठिकाणे शोधून अशा ठिकाणी या जाळ्या बसाविण्यात येणार असल्याची माहिती मलनिस्सारण प्रचारण खात्यातील मुख्य अभियंता सतीश चव्हाण (Chief Engineer Satish Chavan) यांनी दिली.
[read_also content=”बंगला स्मारकात रुपांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण, मुंबई मनपाचा उच्च न्यायालयात दावा https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-municipal-corporation-claims-in-the-high-court-that-the-legal-process-of-conversion-to-bangla-smarak-has-been-completed-304275.html”]
दरम्यान, मुंबईत पाणी तुंबण्याची अनेक ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी जर मॅनहोल उघडे राहिले तर नागरिक यात पडण्याची शक्यता असते. त्यात मुंबईत अडीचशे किलोमीटर लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्या आहेत. वाहिन्यांच्या सफाईच्या दृष्टीने प्रत्येक ३० मीटर अंतरावर मलनिस्सारण वाहिन्यावर ही मॅनहोल ठेवण्यात आली आहेत. मुंबईत ७४ हजाराहून अधिक ‘रोबोहोल’ आहेत. परळ अशाच एका मॅनहोल मध्ये पाडून डॉ. अमरापूरकर यांचा २०१७ साली मृत्यू झाला होता. त्यानंतर मॅनहोल चा मुद्दा ऐरणीवर आला होता. मलनिसारण वाहिनी पूर्वी माणसांकडून स्वच्छ करण्यात येत असल्याने मॅन होल असे नाव होते. सध्या अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून हीं स्वछ करण्यात येत असल्याने त्याला रोबो होल असे नाव देण्यात आले आहे.
संपूर्ण शहरात १४९७ जाळ्या
शहर – ८३४
पूर्व उपनगर – २४६
पश्चिम उपनगर – ४१७