Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; ‘फुले-शाहू-आंबेडकर साहित्य सदना’चे थाटात लोकार्पण

साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी यशवंत उद्यानात 'फुले-शाहू-आंबेडकर साहित्य सदना'चे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 14, 2026 | 06:50 PM
साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

Follow Us
Follow Us:

 

  • साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
  • ‘फुले-शाहू-आंबेडकर साहित्य सदना’चे थाटात लोकार्पण
सातारा, दि. १४ (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सातारा नगरपरिषदेच्या वतीने यशवंत उद्यान येथे अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर, गटनेते अविनाश कदम, पक्षप्रतोद निशांत पाटील, विविध सभापती, नगरसेवक-नगरसेविका तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अशोक गायकवाड (बापू) व संजय गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याच वेळी यशवंत उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या ‘फुले-शाहू-आंबेडकर साहित्य सदना’चेही लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे सामाजिक विचारांची जपणूक आणि वाचन संस्कृतीला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

ऐतिहासिक सुवर्णक्षण! जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाथांच्या पैठणला आले होते; ७५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजरचना घडवून देशाला भक्कम संविधान दिले. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत.

तसेच नव्याने सुरू झालेल्या साहित्य सदनाच्या माध्यमातून युवकांमध्ये वाचनाची आवड वाढेल व सामाजिक जागृतीस चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

DR. Babasaheb Ambedkar : शहरात जाण्यासाठी पैसै चोरणारा भिवा ते अर्थतज्ज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर; महामानवाच्या संघर्षमय गाथा

Web Title: Dr babasaheb ambedkar jayanti satara sahitya sadan inauguration 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • dr babasaheb amdekar
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
1

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
2

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

International Award : सद्गुरू डॉ. मंगेशदा यांचा लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान, भारताचा शिरपेचा मानाचा तुरा
3

International Award : सद्गुरू डॉ. मंगेशदा यांचा लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान, भारताचा शिरपेचा मानाचा तुरा

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
4

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.