Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

सलग अपघातांमुळे निसरेफाटा–गिरेवाडी–मल्हारपेठ मार्गावरील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून, आणखी जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 29, 2026 | 08:37 AM
निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Follow Us
Follow Us:

मल्हारपेठ : पाटण-कराड रस्त्यावरील निसरेफाटा, गिरेवाडी व मल्हारपेठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावर अवघ्या आठवडाभरात सलग झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

निसरेफाटा–गिरेवाडी–मल्हारपेठ परिसरातील रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यातच काही वाहनचालकांकडून भरधाव वेगाने वाहने चालविणे, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे तसेच मद्यसेवन करून वाहन चालविण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. परिणामी, किरकोळ अपघातांबरोबरच गंभीर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Navi Mumbai News : किरीट सोमय्यांविरोधात बजरंग दल आक्रमक, अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून राडा, रबाळे पोलीस ठाण्याबाहेर तणाव

गेल्या आठ दिवसांत घडलेल्या सलग अपघातांमध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागल्याने परिसर हादरला आहे. विशेषतः तरुणांकडून वेगाने वाहने चालविण्याचे प्रकार वाढत असल्याची चर्चा असून, रात्रीच्या वेळी या मार्गावर वाहनांची तपासणी व गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

‘बेधुंद वेगाला आवर घालण्याची गरज’

मद्यसेवन करून वाहन चालविणे हे वाहनचालकासह इतर निष्पाप नागरिकांच्या जीवासाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या मार्गावर विशेष मोहीम राबवून मद्यपी वाहनचालकांची तपासणी करावी, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी तसेच रात्रीच्या वेळी नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, अपघातांची मालिका सुरू राहिल्याने पालकांचीही चिंता वाढली आहे. तरुण मुलांनी दुचाकी अथवा चारचाकी वाहने चालविताना वेगावर नियंत्रण ठेवावे, मद्यसेवन करून वाहन चालवू नये आणि वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

या मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, पथदिवे व इतर सुरक्षा उपाययोजना कराव्यात. तसेच वाहतूक व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

वाहतुकीचा प्रश्न बनला गंभीर

सलग अपघातांमुळे निसरेफाटा–गिरेवाडी–मल्हारपेठ मार्गावरील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून, आणखी जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Web Title: Accident continues on nisrefata girewadi road 3 people died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • Bad Road
  • Satara News

संबंधित बातम्या

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
1

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
2

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त
3

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी
4

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.