Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील लाभामध्ये दुप्पट वाढ; ‘या’ अटीही झाल्या रद्द

अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लाभांची रक्कम दुपटीने वाढली आहे. तसेच अनेक अटीही रद्द करण्यात आल्या आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Sep 30, 2024 | 08:59 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Follow Us:

कृषी विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचेकृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही  अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2017 पासून शासनाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषदेचा निधी वितरित करण्यात येतो. रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान दिले जाते. मात्र त्या तुलनेत या योजनेतील लाभ घेण्यास लाभार्थी इच्छुक नसल्याचे दिसून आल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी योजनेतील लाभ वाढविण्याचे प्रस्तावित केले होते.

या अटी झाल्या रद्द

या योजनेचा लाभ जास्तीजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दीड लाख वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच विहिरीच्या खोलीची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अनेक तांत्रिक अटींमध्ये शासनाकडून   सवलती देण्यात आलेल्या आहेत.

मिळणाऱ्या लाभांची रक्कम दुप्पट

राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे आता अनुसूचित जाती नव बौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरीसाठी 2.5 लाख रुपयांऐवजी 4 लाख रुपये मिळणार आहेत. जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी 50 हजार रुपयांऐवजी 1 लाख रुपये मिळणार आहेत. तसेच शेततळ्यासंबंधी ही निधी वाढविण्यात आला आहे त्यामध्ये शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 1 लाख रुपयांऐवजी 2 लाख मिळणार आहेत.

  • ठिबक सिंचन संच साठी 50 हजार ऐवजी 97 हजार,
  • तुषार सिंचन संच साठी 25 ऐवजी 47 हजार रुपये,
  • तसेच इनवेल बोरिंग साठी 20 हजार ऐवजी 40 हजार रुपये,
  • विद्युत पंप संच साठी 20 हजार ऐवजी 40 हजार रुपये,
  • वीज जोडणी आकार 10 हजार ऐवजी 20 हजार रुपये,
  • सोलार पंपसाठी 30 हजार ऐवजी 50 हजार रुपये,
  • एचपीडीई पीव्हीसी पाईप साठी 50 हजार रुपये,
तसेच तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन पूरक अनुदान  यातसुद्धा जमीन धारणेच्या प्रमाणात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Dr babasaheb ambedkar swavalamban yojana benefit doubling some major conditions have also been cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 08:57 PM

Topics:  

  • babasaheb ambedkar
  • maharashtra

संबंधित बातम्या

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह
1

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ
2

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल
3

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्…
4

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.