Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ

Karjat News: कर्जत तालुक्यातील पाषाणे गावातील गॅलक्सी गृहसंकुलात रात्रीच्या सुमारास तब्बल ११ फूट लांबीचा अजगर आढळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तळमजल्यावर अजगर दिसताच स्थानिकांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 17, 2026 | 05:58 PM
बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ

बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ

Follow Us
Follow Us:
  • पाषाणे येथील गृह संकुलात 11 फुटाचा अजगर..
  • सर्पमित्रांनी सुरक्षितपणे पकडला
  • रहिवाशांमध्ये उडाली खळबळ
 

कर्जत: कर्जत तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या पाषाणे गावातील नवीन वसाहतीमधील गॅलक्सी गृहसंकुलात तब्बल ११ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा हा भला मोठा अजगर इमारतीच्या तळमजल्यावर दिसल्यानंतर काही काळ रहिवाशांची मोठी धावपळ झाली.

गॅलक्सी गृहसंकुलातील केतन चौधरी, भूषण चौधरी, संगम सावंत, प्रमोद खडे आणि प्रसाद पदघमल यांना सर्वप्रथम अजगर दिसून आला. रात्री साडेअकराच्या सुमारास अजगर दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Mumbai Local Train Update : 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोठा दिलासा! अंबरनाथ, बदलापूर, कर्जत प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

सर्पमित्रांना तातडीने पाचारण

अनेक रहिवासी बाहेरून येऊन या परिसरात वास्तव्यास असल्याने त्यांना मोठ्या सापाबाबत अधिक चिंता वाटू लागली. स्थानिकांनी सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. अखेर पाषाणेपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगणी येथील सर्पमित्रांशी संपर्क झाला. यानंतर अमित मयेकर आणि डोणे येथील मेजर राजू दुबे यांनी तातडीने पाषाणे गाठले. दोघांनी गॅलक्सी गृहसंकुलात पोहोचून परिस्थितीची पाहणी केली.

वन विभागाला माहिती देऊन रेस्क्यू ऑपरेशन

अजगर मोठ्या आकाराचा असल्याने सर्पमित्रांनी त्याबाबत वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या सहकार्याने अजगराला सुरक्षितपणे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजता अजगराला यशस्वीरीत्या पकडण्यात आले. तब्बल ११ फूट लांबीचा हा अजगर पाहून सर्पमित्रांनाही काही क्षण आश्चर्याचा धक्का बसला.

नेहमीपेक्षा दुप्पट लांबीचा अजगर

या परिसरातील जंगलांमध्ये आढळणाऱ्या अजगरांची लांबी साधारणपणे पाच ते सहा फूट असते. मात्र, गॅलक्सी गृहसंकुलात सापडलेला अजगर तब्बल ११ फूट लांब असल्याने तो विशेष लक्षवेधी ठरला. अजगराला सुरुवातीला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि सर्पमित्रांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतला.

अखेर घनदाट जंगलात सोडले

अजगराला रात्री डोणे येथे सुरक्षित ठेवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी वन विभागाचे कर्मचारी आणि सर्पमित्रांच्या उपस्थितीत या अजगराला घनदाट जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले. अजगराला कोणतीही इजा न करता त्याची सुटका करण्यात आल्याने स्थानिकांनी सर्पमित्र आणि वन विभागाचे आभार मानले.

पुराच्या पाण्यामुळे अजगर वाहून आल्याची शक्यता

दरम्यान, उल्हास नदीला आलेल्या महापुरामुळे हा अजगर जंगलातून वाहत मानवी वस्तीत आला असावा, असा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, अजगर नेमका कुठून आणि कसा गृहसंकुलापर्यंत पोहोचला, याबाबत अधिकृतपणे निश्चित माहिती समोर आलेली नाही. रहिवासी भागात एवढा मोठा अजगर आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र, सर्पमित्रांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून सुरक्षित रेस्क्यू केल्याने मोठा धोका टळला.

कर्जत पळसदरी महामार्ग रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह, घातपाताची शक्यता

Web Title: 11 foot python rescued from residential complex in pashane karjat news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • Snake

संबंधित बातम्या

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
1

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
2

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
3

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
4

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.