अमरावती : डॉ. दिलीप पांढरपट्टे (Dr. Dilip Padharpatte) हे राज्य सरकारच्या मृदा व जलसंधारण मंत्रालयात (Ministry of Soil and Water Conservation) सचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे एक नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. डी. डी. पांढरपट्टे (भाप्रसे) यांची अमरावतीचे नवीन विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, त्यांना तात्काळ आपल्या नव्या पदाचा कार्यभार स्विकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे (Additional Chief Secretary Nitin Gadre) (भाप्रसे) यांच्याद्वारे एक आदेश जारी करण्यात आला आहे. ज्याद्वारे डॉ. पांढरपट्टे यांना विद्यमान पदाचा कार्यभार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे (Other Backward Bahujan Welfare Department) अपर मुख्य सचिव नंदकुमार (Additional Chief Secretary Nand Kumar ) यांच्याकडे त्वरित सोपविण्याचे आदेश दिले आहे. तर, नवीन पदाचा कार्यभार अमरावतीचे प्रभारी विभागीय आयुक्त नवनीत कौर (Navneet Kaur )(भाप्रसे) यांच्याकडून स्विकारण्याचे सांगितले आहे.






