भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरात असलेल्या ब्लू ओशियन प्रा. लि. कंपनीच्या वेअरहाऊस प्लांटमध्ये अचानक अमोनिया वायूची गळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या कंपनीत खाद्यपदार्थ व आईस्क्रीम कुलिंग करण्यात येत असून मोठ वेअर हाऊस आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. दमकल कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करत हवेत पसरत असलेला अमोनिया वायू नियंत्रणात आणला. वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अधिक तपास सुरू आहे.