सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती
भाजप हा पक्ष लोकशाहीप्रधान पक्ष
सांगलीत मकरंद देशपांडे यांना प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून, शेखर इनामदार यांना बाजूला सरकवण्यात आले. असल्याचे वृत्त चुकीचे आहे. भाजप हा पक्ष लोकशाहीप्रधान पक्ष आहे. येथे बूथपासून राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत सर्व नियुक्त्या निवडणूकांवर आधारित होतात. यामुळेच पक्षाचे १८ कोटी सदस्य आहेत. सध्या मकरंद देशपांडे यांची निवड समन्वय साधण्यासाठी झाली असून, शेखर इनामदार हेचे निवडणूकीचे प्रमुख असतील असे स्पष्ठ केले.
युतीत चांगला समन्वय
महायुतीतील सहयोगी पक्षांना जागा वाटपाबाबत आज बैठक झाली. प्रत्येक पक्षाच्या इच्छुकांनी मुलाखती दिल्या. युतीत चांगला समन्वय आहे. महायुतीतील जागा वाटपाबाबत शिवसेनेला किती, राष्ट्रवादीलाही किती, तर नव्याने आलेल्या जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील यांना किती, यावर चर्चा होईल. मनपा उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेने एजन्सी नेमली आहे. २१, २२, २३ डिसेंबरला सर्वेक्षण अहवाल येईल. प्रभागनिहाय अ, ब, क, ड उमेदवारांची यादी एजन्सीकडून मिळेल. या एजन्सी सर्वेचे पक्षाकडून आकलन होईल. मग निर्णय होईल.
हे देखील वाचा: बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग! कॉंग्रेसची सत्ता घालवण्याचा इतर पक्षांचा प्रयत्न
२९ महानगरपालिका निवडणुकांत महायुती म्हणून लढण्याचा संकल्प
दरम्यान केंद्रात एकनाथ शिंदे व अमित शहा यांची बैठक झाली असून, देवेंद्र फडणवीस शिवसेना-भाजप युतीसाठी आग्रही आहेत. सुहास बाबर बाहेर आहेत ते आल्यावर शेखर इनामदार व इतर कागद-पेन घेऊन प्रत्येक जागेवर रणनीती ठरवतील. सध्या युतीतील शिवसेना (शिंदे गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय), जनसुराज्य आणि काही ठिकाणी रयत क्रांती संघटनेसह महायुतीत सामील पक्षांबरोबर चर्चा झाल्या आहेत. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांत महायुती म्हणून लढण्याचा संकल्प आहे. राष्ट्रवादी (अजित गट) जिथे शक्य असेल तिथे सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादीत वेगळे चालल्याची माहिती मिळत आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
महापौर भाजपचा हे विधिलिखित
आमदार नाईकवाडी यांनी पत्रकार परिषदेत “महापौर राष्ट्रवादाचा होईल” असे म्हटले. यावर “दादा” म्हणाले, प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्यांना सोबत ठेवण्यासाठी असा दावा करावा लागतो. मात्र, विधिलिखित आहे की सांगलीचा महापौर हा भाजपचाच होईल. गेल्या दोन महिन्यांपासून महायुतीसाठी प्रयत्न आहेत, पण यश मिळवायचे आहे. राजकारणात क्षणात बदल होऊ शकतात. राष्ट्रवादी अजित गट एकत्र लढण्यास तयार झाल्यास ते स्वागत आहे.
मुस्लिमात चुकीचा प्रचार
नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांत जिथे जमेल तिथे एकत्र, न जमल्यास स्वतंत्र लढू. अजित गटात भाजप नगरसेवक गेले असल्याच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, “आम्ही आधीच मोठे नेते पक्षात घेतले आहोत. मागील महापालिकेत ११ मुस्लिम उमेदवार उभे केले, काही निवडून आले. मुस्लिम समाजात चुकीचा प्रचार झाला, पण इतर पक्षांनी वर्षानुवर्षे त्यांचे मत गृहीत धरले. भाजपमध्ये फसवणूक नाही.






