जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीसाठी पहिली प्राथमिक बैठक आज पार पडली. शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत दोन्ही पक्षांच्या स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बराच काळ हो-नाहीच्या चर्चेनंतर अखेर ही बैठक झाल्याने जालना राजकीय वर्तुळात या घडामोडीकडे लक्ष वेधले गेले आहे. या बैठकीला भाजपकडून महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, माजी आमदार कैलास गोरंटयाल तर शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुख भास्कर अंबेकर आणि जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे उपस्थित होते. बैठकीदरम्यान दोन्ही पक्षांच्या शहरातील संघटनात्मक ताकद, संभाव्य जागावाटप आणि निवडणूक तयारीबाबत प्राथमिक स्वरूपाची चर्चा करण्यात आली.