Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई; जळगावकरांसमोर मोठं आव्हान

Jalgaon News: जळगावात झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीवरील शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य पाइपलाइन पुरात वाहून गेली. पाइपलाइनचा आधारही तुटल्याने दुरुस्तीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 03, 2026 | 12:06 PM
Jalgaon News: पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पुरात मुख्य पाणीपुरवठ्याची पाइपलाइन वाहून गेली.
  • तांत्रिक अडचणींमुळे दुरुस्तीला १० ते १२ दिवस लागणार.
  • जळगावात पिण्याच्या पाण्याचे संकट गडद 
Jalgaon Water Crisis:  जळगावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने तालुक्यातील तलाव धरण भरले असून बोरीला देखील पूर होता. शहराला पाण्याचा पुरवठा करणारी पाईप लाईनच पुरात वाहून गेल्याने सपोर्टही तुटले, पाईप बसवण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागणार आहे.

अंबरीष टेकडीवरून येणारी पाईपलाईन बोरी नदीच्या जुन्या पुलावरून होती. त्यामुळे नवीन पुल बांधताना जुन्या पुलाचे खांब न तोडता पाईपलाईन जशीच्या तशी ठेवली. काही वर्षांपूर्वी पाईप पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. मात्र त्याच जुन्या सपोर्टवर पाईप टाकले होते.

दोन दिवसांपूर्वी ते वाहून गेले. त्यासोबताच पुलाचा सपोर्ट देखील वाहून गेल्याने आता त्याठिकाणी पाईप टाकणे शक्य नाही. म्हणून पालिकेने पुलावरून पाईप टाकण्याचा निर्णय घेतला. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने विरोध केल्याने सध्याच्या स्थितीतील पाईप टाकणे अशक्य झाले आहे. कमी गेज व कमी वजनाचे पाईप टाकायचे असल्यास ते संबंधित कंपनीकडून पाईप मागवण्यासाठी वेळ लागेल व चाचणीही घ्यावी लागेल आणि त्यांनतर पाईप लाईन जोडणीला चार ते पाच दिवस लागणार आहेत. त्यामुळे एकंदरीत पाणीपुरवठा सुरू करण्यास दहा ते बारा दिवस लागतील.

Jalgaon News: भिशीच्या नावाखाली २० लाखांना गंडविले! नेमकं काय घडलं?

मुख्यधिकारी गणेश शिंदे काय म्हणाले?

यावर जिल्ह्याचे मुख्यधिकारी गणेश शिंदे म्हणाले की, “66 साधारणतः आठ ते दहा पाईप वाहून गेले आहेत. मात्र शहराला दुसऱ्या पाईप लाईन वरून पैलाड. मुंदडा नगर व लक्ष्मीनगर भागातील टाक्यांवरून ३० टक्के पाणी पुरवठा होऊ शकेल, इतर भागात मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे त्रास सहन करावा लागेल. पालिकेने युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे. नागरिकांनी संयम ठेवावा”

सभापती पाणीपुरवठा समिती कैलास पाटील काय म्हणाले?

सभापती पाणीपुरवठा समिती कैलास पाटील यांनी देखील या गोष्टीवर भाष्य केले. त्यावेळी ते म्हणाले की, “66 दुष्काळात तेरावा महिना म्हणून शनिवार आणि रविवारी कंपनी बंद असल्याने पाईप येण्यास उशीर होईल. नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांनी सहकार्य करावे. जलद गतीने काम केले जाईल.”

Jalgaon Crime News: जन्मदात्या बापाचं क्रूर रूप! झोपेत असलेल्या …

डॉ परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष काय म्हणाले?

“पुरामुळे गांधली येथील शुद्ध पाण्याच्या संभ मध्येच गाळ घुसल्याने गांधली पंप बंद पडला आहे. साधारणतः २४ तासात तो पंप सुरू करण्यात येईल सत्येम पाटील, अभियंता, पाणीपुरवठा विभाग ज्या तीन टाक्या सुरू राहणार आहेत तेथून नागरिकांना पिण्याचे पाणी नेण्यासाठी सोय केली जाईल. वापरण्यासाठी प्रत्येक भागात असणाऱ्या बोअरवेल, विहिरी यावरून सोय केली जाऊ शकते, हे अचानक ओढवलेले संकट आहे त्यामुळे नागरिकांनी दहा बारा दिवस सहकार्य करावे पाणी जपून वापरावे” डॉ परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष असे म्हटले आहेत.

 

Web Title: Drinking water shortage during the monsoon itself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Drinking Water
  • Jalgaon News
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
1

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले
3

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले

Jalgaon News: मालमत्ता सहा वर्ष कराचा मुद्दा ऐरणीवर; अमळनेरमध्ये नेमकं काय सुरू आहे?
4

Jalgaon News: मालमत्ता सहा वर्ष कराचा मुद्दा ऐरणीवर; अमळनेरमध्ये नेमकं काय सुरू आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.