Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डीआरपी सीईओंची डीबीए शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा; ‘अनिर्णित पात्रते’बाबत सेक्टरनिहाय शिबिरे आयोजित केली जाणार

धारावी पुनर्विकास प्रकल्प/ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( डीआरपी/एसआरए) प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी धारावी बचाव आंदोलनाच्या (डीबीए) शिष्टमंडळासोबत सोमवारी सकारात्मक चर्चा केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 04, 2026 | 08:04 PM
डीआरपी सीईओंची डीबीए शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा; ‘अनिर्णित पात्रते’बाबत सेक्टरनिहाय शिबिरे आयोजित केली जाणार
Follow Us
Follow Us:
  • डीआरपी सीईओंची डीबीए शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा;
  • ‘अनिर्णित पात्रते’बाबत सेक्टरनिहाय शिबिरे आयोजित केली जाणार
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्प/ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( डीआरपी/एसआरए) प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी धारावी बचाव आंदोलनाच्या (डीबीए) शिष्टमंडळासोबत सोमवारी सकारात्मक चर्चा केली. धारावीमध्ये आयोजित केलेल्या मोर्चानंतर पार पडलेल्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. स्थानिकांच्या अल्प प्रतिसादात पार पडलेल्या या मोर्चात विविध राजकीय पक्षांच्या (धारावी बाहेरील) कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. तरीही, सुमारे 200 ते 250 जण या मोर्चाला उपस्थित असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून मिळाली.

धारावीतील बिस्मिल्लाह हॉटेल जवळून सुरू झालेला हा मोर्चा धारावी पोलिस स्टेशनवरून 90 फीट रोडपर्यंत नेण्यात आला. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड, उबाठाचे खासदार अनिल देसाई, विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, उबाठाचे माहिमचे आमदार महेश सावंत यांच्या शिष्टमंडळाने मोर्चानंतर डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

Dharavi News: धारावी पुनर्विकासात वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांनाही मिळणार हक्काचे घर; ‘हायर-परचेस’ योजनेचा ऐतिहासिक निर्णय

शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना डॉ. कल्याणकर यांनी सांगितले की, आज उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर याआधीच डीआरपीच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. रहिवाशांना प्रकल्पाबाबत अद्ययावत माहिती देण्यासाठी डीआरपी प्रयत्नशील असून, येत्या काळात प्रकल्पाची सेक्टरनिहाय विस्तृत माहिती रहिवाशांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रभावीपणे देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.

या बैठकीत पात्रतेच्या निकषात ‘अनिर्णित’ असलेल्या आणि पात्रता निश्चित न झालेल्या उर्वरित रहिवाशांच्याबाबतही चर्चा करण्यात आली. “अशा प्रकाराच्या अनिर्णित प्रकरणांना हाताळण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात असून यामध्ये रहिवाशांना आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. अशा मोहिमांमुळे पात्रता निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग येईल” अशी माहिती डॉ. कल्याणकर यांनी दिली.

“अनिर्णित म्हणजे अपात्र नसून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या प्रत्येक धारावीकराला प्रकल्पात सामावून घेतले जाईल. यासाठी प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने अभ्यास सुरू आहे” असा पुनरुच्चारही डॉ. कल्याणकर यांनी डीबीए शिष्टमंडळासमोर केला.

धारावीत अस्तित्वात असलेल्या धार्मिक स्थळांबाबत निर्णय घेण्यासाठी माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात निष्पक्ष समिती कार्यरत असल्याची बाब डॉ. कल्याणकर यांनी निदर्शनास आणून दिली. “या संवेदनशील विषयांवर स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्याची तरतूद अस्तित्वात आहे” असेही त्यांनी स्पष्ट केले.

पात्र रहिवाशांची सेक्टरनिहाय माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून, ही माहिती लवकरच रहिवाशांना आणि संबंधित व्यक्तींना देण्यात येणार आहे. यामुळे सर्वेक्षण आणि पात्रतेच्या प्रक्रियेबाबत स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण होऊन संभ्रमाचे वातावरण दूर होऊ शकेल.शांततेत काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, मात्र स्थानिक पोलिसांनी त्वरित दखल घेऊन वाहतूक सुरळीत केली.पुनर्विकास प्रकल्पाला वेग प्राप्त झाला असला, तरीही स्थानिकांच्या समस्या ऐकून त्यांच्या सहभागातूनच हा प्रकल्प पुढे जाईल, अशी ग्वाही डॉ. कल्याणकर यांनी यावेळी दिली.

Mumbai: ‘म्हातारीच्या बुटा’च्या दुरुस्तीसाठी पाऊल! मुंबई महानगरपालिका प्रशासन ७.५ लाख रुपये खर्च करणार

Web Title: Drp ceos hold positive discussions with dba delegation sector wise camps to be organized on undecided eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • dharavi
  • Marathi News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.