'म्हातारीच्या बुटा'च्या दुरुस्तीसाठी पाऊल! मुंबई महानगरपालिका प्रशासन ७.५ लाख रुपये खर्च करणार
बहुसंख्य मुंबईकर राणाणि पर्यटकासाठी कमला नेहरू पार्कमधील ‘म्हातारीचा बूट’ त्याच्या उंच, बुटासारख्या रचनेमुळे, छतामुळे आणि लेसमुळे अनेक सुखद आठवणींशी जोडलेला आहे. आता महापालिका हँगिंग गार्डनमधील या सात दशके, जुन्या प्रतिष्ठित वास्तूची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्याची योजना आखत आहे.अंदाजे ७.२९ लाख रुपये खर्च करून, गंज आणि क्षारापासून संरक्षण करण्यासाठी मुख्य बुटाच्या आकाराचे घर, चिमणीच्या आकाराचे छत, दरवाजे आणि खिडक्यांसह संपूर्ण वास्तूची दुरुस्ती केली जाणार आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
होगंग गार्डनच्या समोर असलेली ‘म्हातारीचा बूट’ ही वास्तू ‘देअर वॉज अँन ओल्ड वूमन हू लिव्हड इन अशू’ या लोकप्रिय इंग्रजी बालगीतावरून प्रेरित आहे. या वास्तूची रचना महापालिकेचे माजी पर्यावरण अधिकारी आणि ‘नीरी’चे माजी अभियंता सोली आर्सीवाला यांनी केली होती. ही वास्तू १९५२ मध्ये जनतेसाठी खुली करण्यात आली. या प्रतिष्ठित वास्तूची देखभाल करण्यासाठी पालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे.
महापालिकेने शुक्रवारी ‘म्हातारीचा बूट’ या वास्तूच्या दुरुस्तीसाठी विविध अभियांत्रिकी संस्थांना आमंत्रित करणारी निविदा काढली. अधिकाऱ्यांच्या मते, सुरुवातीच्या कामात मोडॉक सिमेंट मार्बल, ग्रॅनाइट, शहाबाद किंवा भारतीय नमुन्याचे दगडी पलोअरिंग आणि ग्लेज्ड टाईल्स काढण्याचा समावेश असेल. याव्यतिरिक्त कंत्राटदाराला बांधलेल्या भागांमधील स्टीलवर्क काढणे, रिइन्फोर्समेंट बारपर्यंतचे काँक्रीट काढणे आणि पृष्ठभागावरील तेल, धूळ व इतर अशुद्धी काढून टाकण्याचे काम दिले जाईल. त्यानंतर या प्रकल्पात गंज रोखण्यासाठी प्रायमर आणि अॅटी कॉरोसिव्ह पेंट लावणे, ग्रिल्स आणि मॉडिफाइड सिमेंट यांचा समावेश असेल.
Protocol for MPs and MLAs: दोषी आमदार-खासदारांना ‘स्पेशल ट्रिटमेंट’ बंद! राज्य सरकारचा मोठा निर्णय
या प्रकल्पात सजावटीचे प्रवेशद्वार आणि नैसर्गिक दगडांना पॉलिश करण्याचाही समावेश असेल. महापालिका या प्रकल्पासाठी कोटा स्टोनची खरेदीही करणार आहे. हे काम महापालिकेच्या जल अभियांत्रिकी विभागामार्फत केले जाईल, जो हॅगिंग गार्डन्स कॉम्प्लेक्सच्या देखभालीसाठी जबाबदार आहे.अधिकाऱ्याऱ्यांच्या मते, हे काम ४५ दिवसांत पूर्ण होईल. यापूर्वी २०१८ मध्ये कमला नेहरू पार्कचा टप्याटप्याने सर्वसमावेशक पुनर्विकास करण्यात आला होता. तीन वर्षांत पूर्ण झालेल्या या पुनर्विकासादरम्यान ‘म्हातारीचा बूट’ या रचनेचे नवीन रंग आणि संकल्पनेसह नूतनीकरण करण्यात आले.






