Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिवृष्टीमुळे हळद पिकाच्या उत्पादनात मोठी घट! उमरखेड-महागाव तालुक्यातील स्थिती; विविध रोगाचा प्रादुर्भाव

यंदा काढणी व शिजवणीच्या मजुरी दरात दुपटीने वाढ झाली असून बाजारभाव मात्र पाच ते सहा हजार रुपयांनी घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 06, 2026 | 02:32 PM
अतिवृष्टीमुळे हळद पिकाच्या उत्पादनात मोठी घट! उमरखेड-महागाव तालुक्यातील स्थिती; विविध रोगाचा प्रादुर्भाव

अतिवृष्टीमुळे हळद पिकाच्या उत्पादनात मोठी घट! उमरखेड-महागाव तालुक्यातील स्थिती; विविध रोगाचा प्रादुर्भाव

Follow Us
Close
Follow Us:

उमरखेड महागाव तालुक्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हळद पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. कंदसड, करपा रोगाचा प्रादुर्भाव तसेच हवामानातील बदल यामुळे उत्पादकतेवर विपरित परिणाम झाला आहे. यासोबतच निविष्ठांची वाढती महागाई, मजुरीच्या दरातील मोठी वाढ आणि गतवर्षीच्या तुलनेत घटलेले बाजारभाव यामुळे हळद पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत असून त्यांच्या अर्थकारणाला मोठा फटका बसत आहे. गादी वाफा (बेड) लागवड, ठिबक सिंचन, विद्राव्य खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळे काही प्रमाणात उत्पादनात वाढ झाली होती. तसेच लागवड ते काढणीपर्यंतच्या प्रक्रियेत यांत्रिकीकरण झाल्याने मजुरी खर्च काहीसा कमी झाला होता.(फोटो सौजन्य – istock)

पीककर्ज दरात १२ टक्के वाढ! कर्जमाफीमुळे प्रति हेक्टर पीककर्जाची मर्यादा निश्चित; लक्ष्य मात्र अनिश्चित

मात्र यंदा मजुरांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. साधारणपणे हळदीची सरासरी उत्पादकता एकरी २५ ते ३० क्विंटल असते; मात्र यंदा अतिवृष्टीमुळे ती घटून सुमारे १५ ते २० क्विंटलपर्यंत आली आहे. २०२५ च्या डिसेंबर अखेरपासून हळदीचे दर १७ ते १८ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते, मात्र उत्पादन घट आणि मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. २०२४ च्या तुलनेत लागवडीत वाढ झाली असली, तरी अतिवृष्टीमुळे कंदसड रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. सध्या काढणी हंगाम सुरू असून मजुरांच्या अभावामुळे सुमारे ७० टक्के हळदीची काढणी अद्याप बाकी आहे. काढणी केलेल्या हळदीवर शिजवणी, वाळवणी व चकाकी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हळद लागवडीसाठी घरचे बी असेल तर एकरी सुमारे ६० हजार रुपये, तर विकतचे बी घेतल्यास ८० ते ९० हजार रुपये खर्च येतो. यंदा काढणी व शिजवणीच्या मजुरी दरात दुपटीने वाढ झाली असून बाजारभाव मात्र पाच ते सहा हजार रुपयांनी घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. वर्षानुवर्षे त्याच जमिनीचा सातत्याने वापर, सेलम वाणाच्या शुद्ध बियाण्यांचा अभाव, सेंद्रिय खतांचा कमी वापर व अपुरी उपलब्धता तसेच पीक फेरपालट न केल्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. याशिवाय पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी साचून राहिल्याने कदसडीचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व घटकांचा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला असून अनेक भागात उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे.

टॅक्स कलेक्शनमध्ये अकोला अव्वल; खामगाव दुसऱ्या स्थानावर तर अमरावती विभाग…

मारोती कोत्तेवार, हळद उत्पादक, विडुळ, तीन एकरांवरील हळदीची काढणी पूर्ण झाली असून एकरी सरासरी क्विटलप्रमाणे सुमारे ४५ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. मात्र अतिवृष्टीमुळे कंदसड मोठ्या प्रमाणात झाल्याने उत्पादनात जवळपास ५० टक्क्यांनी घट झाली आहे, काढणीसाठी मजुरी दरात दुपटीने वाढ झाली असून त्याउलट बाजारभाव अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याने शेतकऱ्याऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून वसमत येथील हरीद्रा’ हळद संशोधन केंद्राने रोगप्रतिकारक व उच्च उत्पादकतेचे वाण विकसित करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. सध्या परिसरात उत्पादनात सरासरी ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाल्याने यंदा हळद लागवड कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Due to heavy rain there is a big decrease in the production of turmeric crop situation in umarkhed mahagaon taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • amravati
  • maharashra
  • Turmeric Water

संबंधित बातम्या

Amravati News : 102 टक्के पाऊस; तरीही ‘या’ जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट; वाढते तापमान आणि घटते भूजल
1

Amravati News : 102 टक्के पाऊस; तरीही ‘या’ जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट; वाढते तापमान आणि घटते भूजल

संशयास्पद हालचालींवर मुंबई महानगरपालिका ठेवणार बारीक लक्ष! शहरात बसवले जाणार आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा
2

संशयास्पद हालचालींवर मुंबई महानगरपालिका ठेवणार बारीक लक्ष! शहरात बसवले जाणार आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा

अमरावतीकरांचे २.१७ लाखांचे दरडोई उत्पन्न! मात्र महागाईसमोर हतबल; उद्योगअभावी अर्थव्यवस्था ठप्प
3

अमरावतीकरांचे २.१७ लाखांचे दरडोई उत्पन्न! मात्र महागाईसमोर हतबल; उद्योगअभावी अर्थव्यवस्था ठप्प

आंध्र प्रदेशला मिळाली नवी राजधानी; आंध्र प्रदेश पुनर्रचना सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर
4

आंध्र प्रदेशला मिळाली नवी राजधानी; आंध्र प्रदेश पुनर्रचना सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.