Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Makar Sankranti : सणावर महागाईची संक्रांत; दर वाढल्यामुळे तिळगुळही लागेना गोड

गोड-गोड बोलण्याचा संदेश देणारा आणि नववर्षातील पहिलाच सण असलेली मकरसंक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणासाठी शहरातील बाजारपेठ सजली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 04, 2025 | 10:08 AM
Makar Sankranti : सणावर महागाईची संक्रांत; दर वाढल्यामुळे तिळगुळही लागेना गोड

Makar Sankranti : सणावर महागाईची संक्रांत; दर वाढल्यामुळे तिळगुळही लागेना गोड

Follow Us
Follow Us:

देहूरोड : गोड-गोड बोलण्याचा संदेश देणारा आणि नववर्षातील पहिलाच सण असलेली मकरसंक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणासाठी शहरातील बाजारपेठ सजली आहे. मात्र यंदा बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध असलेल्या साहित्यांच्या चढत्या किमती लक्षात घेता संक्राती सणात सर्वसामान्याना महागाईचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

नववर्षातील पहिला सण म्हणून मकरसंक्रातीला विशेष महत्त्व असतो. मात्र या सणाला लागणाऱ्या भाज्या व इतर वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्याने नागरिकांना खरेदी करताना आखडता हात घ्यावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. उरला असून शहरातील मुख्य बाजारपेठ संक्रांतीसाठी सज्ज होताना दिसत आहेत. संक्रांतीला महिला घरोघरी हळदी-कुंकूचे आयोजन करीत असतात. त्यानिमित्ताने वाण म्हणून एखादी वस्तू दिली जाते. यासाठी बाजारपेठेत स्टीलच्या लहान मोठ्या गृहोपयोगी वस्तू व साहित्य बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. मात्र विविध प्रकारात असलेल्या स्टील साहित्यांच्या किमतीतही मागील वर्षीच्या तुलनेत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिलावर्ग साहित्य खरेदी करताना हात आखडण्याची चिन्हे बळावली आहेत.

तीळ 200 पार, तर गूळ 70 रुपये किलो

मकरसंक्रांती सणात तिळगुळाला मोठे महत्त्व असते. महिलावर्ग तीळ व गुळाचे मिश्रण करून तिळगूळ पदार्थ तयार करून एकमेकांना खाऊ घालतात. मागील वर्षी तिळाचे दर 150 ते 170 रुपये किलो होते, यंदा मात्र तीळ प्रतिकिलो 180 ते 220 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. तर गुळाचे दर प्रतिकिलो 55 ते 70 रुपये किलोवर गेले आहे. तिळगुळाच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे संक्रांतीचे बजेट चांगलेच वाढणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पतंग आणि माज्यांच्या किमतीत यंदा 10 ते 20 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा : फ्रिजच्या कॉम्प्रेशरचा स्फोट, कामगाराचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

चायनीज, नायलॉन मांजाची विक्री सुरूच

शासनाने चायनीज मांजा तसेच नायलॉन मांजावर बंदी असतांनाही शहरात त्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पशुपक्षांसह मनुष्य जीवालाही धोका उद्भवत असल्याने शासनाने यावर बंदी आणली असतानाही बंदी झुगारून मांजाची विक्री होत आहे. या मांजामुळे पंतग उडवितांना अनेक इसम जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने मकरसंक्रातीच्या पर्वावर बंदी असलेल्या मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पतंग बाजारात उपलब्ध आहेत. त्याची किंमत 50 ते 450 रुपयापर्यंत आहे. कागदाच्या पारंपारिक पतंगसुद्धा बाजारात दाखल झाल्या आहेत. त्याची किंमत 8 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत आहेत. याच किंमती मागील वर्षी 5 ते 150 रुपयांपर्यंत होत्या.

Web Title: Due to makar sankrant festival inflation has increased in the market nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 12:00 PM

Topics:  

  • maharashtra
  • makar sankrant
  • Makar Sankranti
  • makar sankranti 2025
  • pune news

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टॅक्सी, रिक्षा, बस चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक
1

Pratap Sarnaik : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टॅक्सी, रिक्षा, बस चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले
2

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर
3

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर
4

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.