सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : पुण्यातील बी.टी. कवडे रस्त्यावर एका भंगार दुकानात जुन्या फ्रिजचा कॉम्प्रेशर काढत असताना त्याचा स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मालकासह तिघे जखमी झाले आहेत. दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत येथे पाण्याचा मारा केला.
महंमद शेख (वय ४९) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर मालक महंमद सय्यद यांच्यासह किशोर साळवे आणि दिलीप मिसाळ हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस संबंधित घटनेची चौकशी करत आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बी. टी. कवडे रस्ता परिसरात नवशा गणपती पुढे भंगार मालाचे मोठे दुकान आहे. या ठिकाणी भंगार दुकान मोठया प्रमाणात माल आहे. भंगारामध्ये जुने फ्रेज आले होते. ते खोलण्यात येत होते. कामगार महंमद शेख हे फ्रेजचा कॉम्प्रेशर काढत होते. तर इतर तिघे जवळ गप्पा मारत बसलेले होते. दरम्यान कॉम्प्रेशरमध्ये असलेल्या गॅसचा अचानक स्फोट झाला. कॉम्प्रेशर उडून महंमद यांना लागले. त्यात गंभीर जखमी झाले. तर इतर वस्तू उडून इतरांना लागल्या.
मोठा स्फोट झाल्याने एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीना रुग्णालयात दाखल केले असताना कामगार महंमद शेख यांचा मृत्यू झाला. इतर किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांनी दिली. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात पोलीस अधिकार्याला लाच देण्याचा प्रयत्न; एसीबीने एकाला रंगेहात पकडले
फ्रिज वापरताना या गोष्टीची काळजी घ्या
फ्रिजच्या स्फोटाबद्दल बोलले जाते तेव्हा फ्रीजमधील कंम्प्रेसरचा स्फोट होतो. रेफ्रिजरेटरच्या मागील बाजूस कॉम्प्रेसर असतो. त्याला एक पंप आणि एक मोटर जोडलेली आहे. ही मोटर पंपाद्वारे कॉइलमध्ये रेफ्रिजरंट गॅस पाठवते. जेव्हा हा वायू थंड होतो आणि द्रव बनतो तेव्हा ते रेफ्रिजरेटरमधील उष्णता शोषून घेते आणि आत ठेवलेली प्रत्येक गोष्ट थंड करते. रेफ्रिजरेटरचे काम करण्याची ही सामान्य पद्धत आहे. कधीही रेफ्रिजरेटरचा वापर करताना त्याचं तापमान ते सर्वात खालच्या पातळीवर म्हणजे सर्वात कमी करु नये. कारण यामुळे रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरवर आवश्यकतेपेक्षा जास्त दाब द्यावा लागतो आणि ते खूप गरम होते आणि ते फुटण्याची शक्यता असते.
जर तुम्ही फ्रिजमध्ये जास्त वेळ काही ठेवत नसाल पण तरीही तो सतत चालू असेल तर सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण तुम्ही फ्रिज उघडण्याआधी किंवा त्यात कोणतीही वस्तू ठेवण्यापूर्वी त्याची पॉवर बंद करणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे रेफ्रिजरेटरमध्ये उष्णता निर्माण होईल कोणत्याही प्रकारचा स्फोट होणार नाही.