
ज्यावेळी ही वृक्षतोड केले जाते त्यावेळी या ठिकाणी जंगलामध्ये वणवा पेटवला जातो. या वणव्यामुळेजंगलातील प्राणी, पक्षी मोठ्या प्रमाणात बेघर होतानाचं विदारक दृश्य पाहायला मिळालं .जंगलामध्ये विविध प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला मिळत असतात.मात्र हेच पक्षी या कालावधीमध्ये यांचे घरटे बनवून त्यामध्ये अंडी आणि त्यांची पिले असतात मात्र याच पिल्ले किंवा अंडे असल्याने ही वनसंपदा जाळली जाते. या ठिकाणी वणवा लावला जातो त्यामुळे पक्षी व त्यांचे घरटे जळून खाक होतात आणि त्यामध्ये असणारे त्यांची पिल्ले व त्यांचे घर उध्वस्त होतात. त्यामुळे पक्षांची व कीटकांची मोठे जीवित आणि पाहायला मिळत आहे. मात्र एकीकडे जंगलतोड केली जाते तर दुसरीकडे विचार केला तर त्या जंगलामध्ये वणवा लावला जातो याकडे नक्की कोण लक्ष देणार असा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे. असे सतत सुरू असून वन विभाग या वनव्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
वनविभागाच्या देखरेखीखाली असलेल्या या परिसरात वनअधिकारी काहीच कारवाई करत नाही त्याचबरोबर घडणाऱ्या प्रकारावर मूग गिळून गप्प राहतात त्यामुळे जंगल तोडीमुळे औषधी वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर तर आहेतच पण शिवाय लाखो पक्षी घर बेघर होत आहेत. ही बाब चिंताजनक असून देखील अधिकारी कोणतीही ठोस भूंमिका घेत नसल्याने परिसरातील नागरिक देखील आक्रमक झाले आहेत.