Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कास पठारावर धावणार ई बस; जिल्हाधिकारी ऋषिकेश जयवंशी यांच्याकडून प्रारंभिक चाचपणी

कास पठारावर खाजगी वाहने टाळून इलेक्ट्रिक बस कशी सुरू करता येईल, याकरिता जिल्हाधिकारी ऋचेष जयवंशी यांनी पर्यटन मंत्रालयाच्या आदेशाने आज पाहणी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 06, 2022 | 07:48 PM
कास पठारावर धावणार ई बस; जिल्हाधिकारी ऋषिकेश जयवंशी यांच्याकडून प्रारंभिक चाचपणी
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : कास पठाराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. येथील फुलांचे दर्शन घेण्यासाठी वाढलेल्या पर्यटकांमुळे आणि पठारावर येणाऱ्या वाहनांमुळे येथे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. हे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यटन विभागाने तातडीने हालचाली सुरू केले आहेत. या पठारावर खाजगी वाहने टाळून इलेक्ट्रिक बस कशी सुरू करता येईल, याकरिता जिल्हाधिकारी ऋचेष जयवंशी यांनी पर्यटन मंत्रालयाच्या आदेशाने आज पाहणी केली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल साताऱ्याचे प्रांत मिनाज मुल्ला जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, साताऱ्याचे तहसीलदार राजेंद्र जाधव, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, मेढा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल रंजन सिंह परदेशी व साताऱ्याचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण कास पठार कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव सोमनाथ बुढळे इत्यादी यावेळी उपस्थित होते.

पुण्यातील पीएमपीएल व्यवस्थापक मंडळाचे जेष्ठ पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी व प्रांत मिनाज मुल्ला यांनी अनावळे गणेश खिंड मंदिर ते अटाळी यादरम्यानच्या भागाची पाहणी केली. आणावळे परिसरातील गणेश खिंड येथे विस्तीर्ण पठाराचा परिसर असल्याने येथे खाजगी वाहनांचे पार्किंग करून खाजगी मालकांच्या जमिनी भाडेपट्ट्याने घेता येईल का या संदर्भामध्ये चाचपणी सुरू झाली आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रायोगिक तत्त्वावर पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत, त्या अंतर्गत कास पठार येथे खाजगी वाहनांचे प्रदूषण टाळण्याकरिता फुलांचा हंगाम पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना ईबसची सफारी कशी घडवता येईल याकरिता नियोजन सुरू झाले आहे. या संदर्भातील पाहणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली.

[read_also content=”मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात वाई तालुक्यातील दोघांचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/two-people-from-y-taluka-died-in-a-horrific-accident-on-the-mumbai-expressway-nrdm-323081.html”]

तसेच स्थानिक गावातील तरुणांना रोजगार मिळावा या दृष्टीने त्यांना टुरिस्ट गाईड म्हणून शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन त्यांची या हंगामामध्ये नेमणूक करण्याचाही मानस असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी ऋचेष जयवंशी म्हणाले, ही प्राथमिक चाचणी पहिल्या टप्प्यातील असून येथे कितीही बस धावणार या संदर्भातील पुढील विकासाचे नियोजन काय आहे, याचे स्पष्ट निर्देश पर्यटन मंत्रालयाकडून येणे बाकी आहे. मात्र ई- बस जर सुरू झाली तर त्याच्या पायाभूत सुविधा कशा निर्माण करता येतील, याकरिता हा आजचा पाहणी दौरा आहे. पुढील आठवड्यामध्ये कास कास पठार समितीचे सदस्य पर्यावरण तज्ञ तसेच येथील स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करूनच सर्वसमावेशक आराखड्याचा अहवाल पर्यटन मंत्रालयाला पाठवला जाणार आहे.

Web Title: E bus will run on kas plateau initial inspection by collector rishikesh jayavanshi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2022 | 07:48 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Kas Pathar
  • Mangal Prabhat Lodha
  • Satara News

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
1

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण
2

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा
3

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा
4

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.