Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस; एकनाथ खडसेंची टीका

एकीकडे शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. याबाबत चिंता करण्याची आवश्यकता मंत्र्यांना भासत नाही, हे दुर्दैव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 06, 2025 | 01:55 PM
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस

Follow Us
Follow Us:

जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांना सवाल करत शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केला. ‘कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस आहे. राज्याचा कृषिमंत्री अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे’, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला. त्यांनी मंत्री कोकाटे यांच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस आहे. राज्याचा कृषिमंत्री अशा स्वरूपाच वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी मतदारांनी केली नव्हती. मत मागण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करू, अशी घोषणा तुम्ही केली होती. कर्जमाफी होत नाही म्हणून वेगवेगळ्या कारणांनी तुम्ही शेतकऱ्यांना बदनाम करत आहात हे बरोबर नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एकीकडे शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. याबाबत चिंता करण्याची आवश्यकता मंत्र्यांना भासत नाही हे दुर्दैव आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागून आपले वक्तव्य मागे घ्यावे. राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये उपचारा आधीच पैसे जमा करण्याचा आग्रह केला जातो. महात्मा ज्योतिबा फुले किंवा अन्य योजनेचा लाभ जरी असला तरी आधी पैसे द्या, मग उपचार करू, असे सर्रास रुग्णांची लूट करण्याचा प्रकार सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

…नंतर पैशांचा आग्रह धरा

तसेच काही ठिकाणी असे प्रकार होतही नसतील. मात्र, काही रुग्णालयांमध्ये असे प्रकार होत आहेत. वैद्यकीय हा व्यवसाय आहे. पैशांची आवश्यकता भासते हे ठीक आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून जी टोकाची भूमिका घेतली जाते हे चुकीची आहे. रुग्णालयांनी उपचाराआधी पैशांचा आग्रह न धरता आधी उपचार करा आणि नंतर पैशांचा आग्रह धरा, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Eknath khadse criticized on manikrao kokate nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • eknath khadse
  • Maharashtra Politics
  • Manikrao Kokate

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
1

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण
2

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण

Shiv Sena Protest: ‘मर्सिडीज द्या, टेंडर घ्या!’ म्हणत शिवसेनेचे आंदोलन; नेत्यांच्या वाहनावरून महापालिकेत गदारोळ
3

Shiv Sena Protest: ‘मर्सिडीज द्या, टेंडर घ्या!’ म्हणत शिवसेनेचे आंदोलन; नेत्यांच्या वाहनावरून महापालिकेत गदारोळ

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ९२ लाख महिला अपात्र; काय होती  मुख्य कारणे?
4

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ९२ लाख महिला अपात्र; काय होती मुख्य कारणे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.