
Kolhapur Politics, Ravikiran Ingavale, Rajesh Kshirsagar, Video Bomb, Shivsena UBT
Rajesh Kshirsagar Sting Operation: कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमु रवीकिरण इंगवले यांनी शिंदे गटाते आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा एक व्हिडीओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. वर्षभरापूर्वी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत क्षीरसागर यांनी टक्केवारीतून पैसे मागत असल्याला व्हिडीओ पोस्ट केला आहे. यासंबंधित व्यक्तीने पाच टक्क्यांच्या हिशोबाने ४० लाख रुपये राजेश क्षीरसागर यांना दिल्याचा दावाही रवीकिरण इंगवले यांनी केला आहे.
संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. रविकिरण इंगवले यांनी हा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करत आमदार क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचार, खंडणी आणि दमदाटीचे गंभीर आरोप केले आहेत. टेंडरमधील कमिशन आणि टक्केवारीच्या व्यवहारावरून हा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, जिल्ह्यात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
रविकिरण इंगवले यांनी व्हिडिओचा हवाला देत आमदार क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. शासकीय किंवा विकासकामांच्या टेंडरमधील ठरलेले कमिशन अथवा टक्केवारी न मिळाल्यास संबंधित व्यक्तींना त्रास दिला जातो. व्यवहार फिस्कटल्यानंतर समोरच्या व्यक्तीशी कशा प्रकारे वागणूक दिली जाते, हे याचे जिवंत उदाहरण असल्याचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सध्याचा व्हिडीओ हा कोल्हापूरच्या बाहेरचा असून तो या व्हिडिओवर 25 ऑक्टोंबर 2025 ची तारीख आहे. या व्हिडिओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर दिसत आहेत. तर संबंधित व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आहे. या व्हिडिओमध्ये जवळपास सात टक्के कमिशनसंदर्भात चर्चा केली जात आहे. राजेश क्षीरसागर यांना पाच टक्के तर, राहुल आणि प्रशांत यांना प्रत्येकी १ टक्के दिले जावेत, असे नियोजन केल्याचे संभाषण आहे. 5 टक्क्यांप्रमाणे आमदार क्षीरसागर यांना 40 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती या संभाषणातून दिसून येत आहे. तसेच, राहुल नावाच्या व्यक्तीला अकाऊंटवर पैसे दिल्याचेही कबूल केले या संपूर्ण वाटाघाटीनंतर व्यवहार मान्य नसल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले आहे.
हा कथित व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर रविकिरण इंगवले यांनी संबंधित प्रकारची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमदार क्षीरसागर यांचा कमिशनखोरीचा खरा चेहरा समोर आल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचेही इंगवले यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या सर्व प्रकरणी राजेश क्षीरसागर यांना याबाबत विचारले असता, या व्हिडिओबाबत लवकरच माझी प्रतिक्रिया देईल तसेच, उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याचेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे.