'तर गंगा मैली होईल'; शिंदे गटाचा संजय राऊतांवर तिखट वार
संजय राऊत यांच्याकडून सातत्याने शिंदे गटावर टीका केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीमुळे शिवसेनेच्या दोन्ही गटात वाद पेटला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर आलं आहे. संजय राऊत यांनी गंगेत स्नान केली तर गंगा मैली होईल, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शहाजी बापू पाटील म्हणाले,उद्धव ठाकरे यांना कुणीही धक्का देत नाही. उद्धव ठाकरे यांची वर्तवणूकच त्यांना धक्का देत आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतःबाबत आत्मचिंतन करावे. त्यांनी खऱ्या शिवसेनेसोबत यावे, असा सल्ला शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिला.
अलीकडेच उद्धव ठाकरेंनी पक्षातील आऊटगोंईगवर बोलताना मी आता धक्का पुरूष झालोय, असं वक्तव्य केलं होते. त्यावर शहाजी पाटील यांनी ठाकरे यांना टोला लगावला आहे. काँग्रेससोबत उद्धव ठाकरे यांना सत्तास्थापन करायला लावणाऱ्या संजय राऊत यांच्याकडून हिंदुत्वाची अपक्ष करणे चुकीचे आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी कुंभमेळ्यात गंगेच्या स्नानाला जाऊ नाही. संजय राऊत यांनी कुंभामध्ये स्नान केले तर गंगा मैली होऊन जाईल. त्यामुळे ही घाण इथच नारळाच्या झाडाखाली राहू द्या. गंगेत घाण घेऊन जाऊ देऊ नका, अशी टीका माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली.
दरम्यान, नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत. घडत असणाऱ्या गोष्टी पाहिल्याशिवाय नीलम गोऱ्हे मर्सिडिजबाबत असे विधान करणार नाहीत, असं शहाजी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.