Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“चारही देशांचा भारताच्या बाजूने पाठिंबा मिळवला, हे बघून …”, एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रीकांत शिंदेंचे कौतुक

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज मायदेशी परतले. चार देशांच्या दौऱ्यात खासदार डॉ. शिंदे यांना १४० कोटी भारतीयांची भूमिका मांडण्याची संधी मिळाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 06, 2025 | 03:21 AM
एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रीकांत शिंदेंचे कौतुक (फोटो सौजन्य-X)

एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रीकांत शिंदेंचे कौतुक (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे: परदेशात खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात १४० कोटी भारतीयांची भूमिका आंतरराष्ट्रीय मंचावर समर्थपणे मांडली. एक वडील म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा अभिमान वाटतो, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. तब्बल दोन आठवड्यांच्या परदेश दौऱ्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे बुधवारी रात्री ठाण्यातील निवासस्थानी परतले. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल; पुणे पोलिसांनी आखली विशेष मोहीम

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज मायदेशी परतले. चार देशांच्या दौऱ्यात खासदार डॉ. शिंदे यांना १४० कोटी भारतीयांची भूमिका मांडण्याची संधी मिळाली. ही भूमिका खासदार डॉ. शिंदे यांनी समर्थपणे बजावली, त्याचा अभिमान वाटतो, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेडिकल प्रॅक्टिसऐवजी डॉ. श्रीकांतला राजकारणासारख्या वेगळ्या क्षेत्रात आणले का, असा आपला समज झाला होता, मात्र आज खऱ्या अर्थाने खासदार डॉ. शिंदे यांनी हा निर्णय योग्य ठरवला.

खासदार डॉ. शिंदे यांनी या दौऱ्यात केवळ भारताची बाजू उत्कृष्टपणे मांडली नाही तर चारही देशांचा भारताच्या बाजूने पाठिंबा मिळवला, हे बघून कोणाचेही उर अभिमानाने भरुन येईल, अशीच आपली अवस्था असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या शिष्टमंडळात अहलुवालियांसारखे ज्येष्ठ नेते होते. तरुणांना नेतृत्वाची संधी देण्याबरोबरच ज्येष्ठांना मार्गदर्शनासाठी सोबत पाठवणे यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यापक दृष्टीकोन दिसून आला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, एनडीए बैठकीत ऑपरेशन सिंदूरचा प्रस्ताव मांडण्याची आपल्याला संधी दिली तर डॉ. श्रीकांत शिंदे या युवा खासदार विश्वास ठेवून त्याला शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दहशतवादाविरोधात भारताची भूमिका आणि ऑपरेशन सिंदूरसंदर्भात जगभरातील जवळपास ३४ देशांमध्ये खासदारांची विविध शिष्टमंडळे गेली होती. पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख उत्तर दिले. निरपराध नागरिकांना न मारता दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि पंतप्रधान मोदी यांनी युद्धनिती दाखवून दिली. ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराचे शौर्य दिसून आले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य हीच भूमिका भारताची आहे. ही भूमिका जगाला पटवून देण्याचे काम खासदारांच्या शिष्टमंडळाने केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Churchgate Station Fire News: मोठी बातमी! चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग; कारण अद्याप अस्पष्ट

Web Title: Eknath shinde on shrikant shinde news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 03:21 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shrikant Shinde
  • thane

संबंधित बातम्या

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..
1

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
2

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
3

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द
4

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.