चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग (फोटो -सोशल मिडिया)
मुंबई: चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रेल्वे स्थानकावरील एका केकच्या दुकानात शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे आग लागली असल्याची प्राथमिक बातमी समोर येत आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांची आणि रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चर्चगेट रेल्वे स्थानकावर असलेल्या केकच्या दुकानात शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे ही आग लागली आणि पसरली.
आग लागल्याचे समजताच प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. आग शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. चर्चगेट रेल्वे स्थानकावर असलेल्या एका केकच्या दुकानात शॉर्ट सर्किट झाले आणि ही आग लागली असे समजते आहे. सध्या स्थानकावरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.