Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने घेतली दखल; कॉंग्रेसने केली होती तक्रार

भाजपचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सुधीर मुनगंटीवार यांनी कॉंग्रेस पक्षाबाबत वादग्रस्त विधान केले होते.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 10, 2024 | 04:30 PM
सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने घेतली दखल; कॉंग्रेसने केली होती तक्रार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – भाजपचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सुधीर मुनगंटीवार यांनी कॉंग्रेस पक्षाबाबत वादग्रस्त विधान केले होते. मुनगंटीवारांच्या वक्तव्याची थेट निवडणूक आयोगाने (Election Commission) दखल घेतली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विटरवर पोस्ट करत, निवडणूक आयोगाला टॅग करून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या याच पोस्टला उत्तर देत निवडणूक आयोगाने ‘आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे’ असे उत्तर दिले आहे.

कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी मुनगंटीवार यांची व्हिडिओ ट्वीट करत भाजपवर हल्लाबोल केला. सचिन सावंत यांनी लिहिले आहे की, “निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. “एका भावाला बहिणीबरोबर ” सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे. नुकतेच “आप”च्या मंत्री आतिशी यांनी भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर दिली असा आरोप केला, तेव्हा निवडणूक आयोगाने आतिशींना नोटीस पाठवली. जगनमोहन रेड्डी यांना तसेच सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस पाठवली. निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या विधानांवर निवडणूक आयोगाच्या मतानुसार कारवाई करतील ही अपेक्षा. मुनगंटीवार यांच्या या भाषेला आणि खोट्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. आम्हाला केवळ सत्य सांगावे लागेल.” असे सचिन सावंत यांनी लिहिले आहे.

निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. “एका भावाला बहिणीबरोबर ” सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे.
नुकतेच “आप”च्या मंत्री आतिशी यांनी… pic.twitter.com/orr8dw6yYl
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 8, 2024

सचिन सावंत यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाचं उत्तर….

सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाईची मागणी करत सचिन सावंत यांनी केलेल्या ट्विटला निवडणूक आयोगाकडून उत्तर देण्यात आला आहे. ज्यात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की,’आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. निवडणूक काळातील कोणत्याही गैरप्रकाराबद्दल आपण cVigil या ॲपवर तक्रार दाखल करू शकता.  प्रत्येक तक्रारीवर 100 मिनीटांमध्ये पहिली कार्यवाही’ असे निवडणूक आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर

दरम्यान काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की,”1984 साली काँग्रेसने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेसने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही. 1984 च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोकपणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नाही,असे मुनगंटीवार म्हणाले.

Web Title: Election commission took note of sudhir mungantiwars statement congress had complained nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2024 | 04:30 PM

Topics:  

  • Election Commission
  • political news
  • sachin sawant
  • Sudhir Mungantiwar

संबंधित बातम्या

‘५० खोक्यां’चे लाभार्थी संतोष बांगर? भाजप आमदारांच्या आरोपावर बांगर यांचे जोरदार प्रत्युत्तर
1

‘५० खोक्यां’चे लाभार्थी संतोष बांगर? भाजप आमदारांच्या आरोपावर बांगर यांचे जोरदार प्रत्युत्तर

विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात! देगलूर नगर परिषद निवडणूकीत १८ महिला उमेदवारांचा समावेश
2

विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात! देगलूर नगर परिषद निवडणूकीत १८ महिला उमेदवारांचा समावेश

Alibaug : अलिबागला हायटेक सिटी बनवणार; महायुतीच सक्षम –ॲड. महेश मोहिते
3

Alibaug : अलिबागला हायटेक सिटी बनवणार; महायुतीच सक्षम –ॲड. महेश मोहिते

ज्योती पाटील मजबूत उमेदवार असल्याचे मुख्यमंत्र्यांनाही मान्य; भाजपच्या स्थानिक नेत्यांची बंडाळी?
4

ज्योती पाटील मजबूत उमेदवार असल्याचे मुख्यमंत्र्यांनाही मान्य; भाजपच्या स्थानिक नेत्यांची बंडाळी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.