
पंचायत समिती सभापती-उपसभापती निवड १० मार्चला (Photo Credit- X)
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुका 9 फेब्रुवारी रोजी पार पडल्या होत्या. यात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसोबतच दहा पंचायत समित्यांचा समावेश होता. ग्रामविकास विभागाने दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीसाठी नवनियुक्त सदस्यांच्या बैठका 20 मार्चपूर्वी घेण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकार्यांना पाठवले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात पंचायत समिती सभापतींच्या निवडी दहा मार्च रोजी विशेष सभा घेऊन यामध्ये सभापती आणि उपसभापती निवड करण्यात येणार आहेत. सभापतींच्या निवडी झाल्यानंतर आठवडाभरातच जिल्हा परिषद अध्यक्ष निवडही होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील दहा पंचायत समितीमध्ये विविध पक्षांना सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी दोन ठिकाणी सत्ता मिळाली आहे. तसेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला एका पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सत्ता स्थापन करणार असून मिरजेत भाजप-शिवसेना सत्ता स्थापन करू शकते, अशी राजकीय स्थिती आहे. ग्रामविकास विभागाकडून अध्यक्ष आणि सभापती निवडीबाबतचे पत्र आल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद मिळवण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
सकाळी ११ ते १२ – उमेदवारी अर्ज दाखल
दुपारी १२ ते १२.३० – अर्ज छाननी
दुपारी १२.३० ते १ – अर्ज माघार
दुपारी २ वाजता – सभापती व उपसभापती निवड
| तालुका | संभाव्य सत्ताधारी पक्ष/आघाडी |
| वाळवा | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) |
| कवठे महांकाळ | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) |
| पलूस | काँग्रेस |
| कडेगाव | काँग्रेस |
| खानापूर | शिवसेना (शिंदे गट) |
| आटपाडी | शिवसेना (शिंदे गट) |
| जत | भाजप |
| मिरज | भाजप-शिवसेना युती |
| तासगाव | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| शिराळा | राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार गट संयुक्त) |