Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पलूसमध्ये धनगर आरक्षणासाठी एल्गार; तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

अंमलबजावणीसाठी शासनाला दिलेली मुदत संपल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील सर्व तहसीलदार, प्रांताधिकारी यांना निवेदन द्यावे असे आवाहन धनगर समाजाला केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पलूस तालुका धनगर आरक्षण समितीच्या वतीने तहसील कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 23, 2023 | 02:38 PM
पलूसमध्ये धनगर आरक्षणासाठी एल्गार; तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा
Follow Us
Follow Us:
पलूस : अंमलबजावणीसाठी सरकारने ५० दिवसांचा वेळ मागितला होता. परंतु धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शासनाला दिलेली मुदत संपल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील सर्व तहसीलदार, प्रांताधिकारी यांना निवेदन द्यावे असे आवाहन धनगर समाजाला केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पलूस तालुका धनगर आरक्षण समितीच्या वतीने तहसील कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
तहसील कार्यालयासमोर तहसीलदार निवास ढाणे यांना धनगर कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, धनगर समाजाच्या उद्धारासाठी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा. मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करा व योजना कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र अध्यक्षाची नेमणुक करा. जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या २२ योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही. त्याबाबत आढावा घेऊन उपाययोजना करा. मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर स्वतंत्र कायदा आणून त्यांना संरक्षण देणे .धनगर समाज देवस्थानाच्या सर्वांगिण विकासासाठी २०० कोटी रूपयांचा निधी द्यावा.तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरासाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे आदी मागणी करण्यात आली.
ढोलाच्या आवाजाने परिसर दणाणला
आंदोलनाची सुरुवात पलूस पोलीस ठाण्यापासून करण्यात आली. यावेळी धनगरीत ढोलाच्या दणदणाटात तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून निघाला. यावेळी धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा आंदोलन ठिकाणी निषेध करण्यात आला. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं ही घोषणा देण्यात आली.
[blockquote content=”राज्यात सुमारे अडीच ते तीन कोटी धनगर समाज अस्तित्त्वात आहे. डोंगरदऱ्यात राहणारे, भटकंती करुन उपजिवीका भागवणारे धनगर बांधव आजही विकासापासून वंचित आहेत. कित्येक पिढ्या ही मागासलेपणाची झळ सोसत आहेत. गेल्या ७० वर्षांमध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणीपासून फारकत घेतली.” pic=”” name=”- कुंडलिक एडके, माजी जिल्हा परिषद सदस्य”]
[blockquote content=”मुख्यमंत्री कोणत्याही विशिष्ट समुहाचे नसतात, ते सर्वसमावेशक आहेत. एका विशिष्ट समुदायासाठी ते खास प्रयत्न करत असून धनगर आरक्षणाकडे त्यांची उदासीनता दिसून येते.मुख्यमंत्र्यांनी तातडीने धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा समाजाच्या संविधानिक तीव्र लढ्याला सरकारला सामोर जावं लागेल.” pic=”” name=”- ऋषी टकले , अध्यक्ष हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना”]

Web Title: Elgar for dhangar reservation in paloos protest march at tehsil office nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2023 | 02:38 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Dhangar Reservation
  • gopichand padalkar
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
2

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
3

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
4

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.