
Raigad News: माथेरानमधील हेरिटेज वास्तूंच्या परवानग्यांवर प्रश्नचिन्ह! RTI मधून धक्कादायक माहिती समोर, नगरपरिषदेची चौकशी होणार
तक्रारदार दिगंबर चंदने यांनी २८ जुलै २०२६ रोजी माहिती अधिकारांतर्गत डिसेंबर २०२३ पासून एमपी व बीपी भूखंडांवर दिलेल्या दुरुस्ती परवानग्या, मॉनिटरिंग व हेरिटेज कमिटीचे अहवाल, स्ट्रक्चरल ऑडिट आणि कामापूर्वी व नंतरच्या छायाचित्रांची माहिती मागितली होती. नगरपरिषदेच्या जनमाहिती अधिकारी तथा प्रभारी बांधकाम विभाग प्रमुखांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या उत्तरात काही परवानग्यांच्या प्रती दिल्या; मात्र अटींची पूर्तता झाल्याचे महत्त्वाचे अभिलेख कार्यालयीन दप्तरी उपलब्ध नसल्याचे कळवले. (फोटो सौजन्य – AI Created)
गार्डन रिसोर्ट (भूखंड क्र. १३५), सेक्रेटरी ऑफ मर्चेंट नेव्ही (१०४), केकी लॉज (१४७), एल्फिन्स्टन लॉज (४१) आणि कच्छ कैसल (०५) या मालमत्तांच्या परवानग्यामध्ये हेरिटेज मंजुरी व स्ट्रक्चरल ऑडिटच्या अटी असतानाही मूळ अभिलेख उपलब्ध नाहीत. हेरिटेज समितीचे ठराव, स्थळपाहणी आणि छायाचित्रे कुठे आहेत, याची सखोल पडताळणी व्हावी. – दिगंबर चंदने, ताम्रारदार
या विसंगतीविरोधात तक्रारदार दिगंबर चंदने यांनी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा सहआयुक्तांनी दि. ३ नोव्हेंबर रोजी माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून नियमोचित चौकशीसह स्वयंस्पष्ट अभिप्रायाचा पूर्तता अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ऐतिहासिक वारसा व हेरिटेज नियमांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या माथेरानमध्ये या चौकशीतून कोणते सत्य बाहेर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उल्लेखित मालमत्ताः
गार्डन रिसोर्ट प्रा. लि. (भूखंड क्र.
सेक्रेटरी ऑफ मर्चेंट नेव्ही (१०४),
केकी लॉज (१४७),
एल्फिन्स्टन लॉज (४१) आणि
कच्छ कॅसल (०५),
गहाळ :
हेरिटेज समितीची मंजुरी.
सादर करायची माहिती
कीचे इतिवृत्त व ठराव, तज्ज्ञांचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल, स्थळपाहणी नोंद आणि दुरुस्तीपूर्वी व नंतरची छायाचित्रे.
प्रशासकीय कारवाईः
२८ जुलै २०२६ रोजी आरटीआय अर्ज
१० ऑगस्टला अभिलेख नसल्याचे उत्तर:
३ नोव्हेंबर रोजी जिल्हा सहआयुक्तांकडून मुख्याधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश.