Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: राजपथावरील अतिक्रमणांचा लवकरच निपटारा करणार, राजवाडा ते देवी चौक या दरम्यानच्या रस्त्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

राजपथावरील अतिक्रमण संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन दोन्ही बाजूला पार्किंगच्या सुविधा दिल्या जातील असे स्पष्ट आश्वासन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 14, 2026 | 05:06 PM
राजपथावरील अतिक्रमणांचा लवकरच निपटारा करणार

राजपथावरील अतिक्रमणांचा लवकरच निपटारा करणार

Follow Us
Close
Follow Us:

गोलबाग राजवाडा ते देवी चौक यादरम्यानच्या अत्यंत वर्दळीच्या राजपथावरील वाहतुकीची आणि एकंदर येथील व्यवस्थेची नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शनिवारी पाहणी केली. राजपथावरील अतिक्रमण संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन दोन्ही बाजूला पार्किंगच्या सुविधा दिल्या जातील असे स्पष्ट आश्वासन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण, नगरसेवक जयवंत भोसले, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेविका प्राची शहाणे, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत गोडसे, तसेच सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाचे नियंत्रण अधिकारी दिलीप चिद्रे इत्यादी यावेळी उपस्थित होते.

LPG Crisis: मुंबईत ‘गॅस माफिया’ सक्रिय! पोलिसांनी १७२ सिलिंडर जप्त करत काळाबाजार उधळला

नगराध्यक्ष अमोल मोहिते व सातारा शहरातील व्यापारी यांच्यात येथील छत्रपती शिवाजी सभागृहांमध्ये बैठक होऊन विविध विषयांवर चर्चा झाली. राज्य शासनाच्या वतीने राजपथ हा संपूर्ण काँक्रीट होणार असून यासंदर्भामध्ये लवकरच निविदा प्रक्रियेनंतर कामाला सुरुवात होणार आहे. या कामाच्या संदर्भाने नगराध्यक्षांनी देवी चौक ते गोलबाग राजवाडा यादरम्यान चर्चेनंतर प्रत्यक्ष पाहणी करून व्यापाऱ्यांशी सुद्धा विविध समस्यांवर चर्चा केली. राजपथावर असणारी अतिक्रमणे, वाहतुकीची कोंडी तसेच व्यापाऱ्यांची दुकाने खाली जाऊन रस्ता वर गेल्याने पावसाचे पाणी घरात जाते काही भागांमध्ये रस्त्यावरील पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही याबाबत व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या .राजपथावर आकर्षकजुन्या पद्धतीचे तुळशी दिवे लावण्यात आले आहेत या दिव्यांचा मेंटेनन्स सातत्याने होत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली .बांधकाम अभियंता दिलीप छिद्रे व नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बारकाईने या समस्यांच्या नोंदी घेऊन प्रत्यक्ष काम करताना बांधकाम विभागाने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले .

प्रसार माध्यमांशी बोलताना अमोल मोहिते म्हणाले सातारा शहरांमध्ये राजपथ हा सर्वात महत्त्वाचा रस्ता असून पोवई नाका व राजवाडा यांना जोडणारा तो वर्दळीचा रस्ता आहे . या रस्त्यावरील अतिक्रमणांसंदर्भात येत्या काही दिवसांमध्ये लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल .तसेच रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग करण्याच्या संदर्भाने विचार सुरू असून मंडईच्या खालच्या बाजूला पार्किंग तसेच जनावरांच्या जुन्या दवाखान्यालगत नवीन चौपाटी होणार असून तेथेही पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे . राजपथाचे काँक्रिटीकरण करताना रस्त्याची लेवल बघूनच त्याचे बांधकाम केले जाणार असून पाण्याचा व्यवस्थित गटाराच्या माध्यमातून निचरा होईल अशी व्यवस्था केली जाणार आहे .राजपथावर विद्युत व्यवस्था ही रात्रीच्या वेळी पुरेशा प्रमाणात राहील तसेच कोठेही अस्वच्छता आढळणार नाही अशी स्पष्ट वाही नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिली .

Bhayander News : मानवी वस्तीत मगरीचा मुक्त संचार; मांडवी पाडा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Web Title: Encroachments on rajpath will be cleared soon mayor inspects the road between rajwada and devi chowk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती द्या; राहुल कलाटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
1

पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती द्या; राहुल कलाटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!
2

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती
3

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम
4

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.