Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी; ‘या’ तारखेपासून होणार अंमलबजावणी

कार्तिकी एकादशी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा उत्सव यावर्षी ५ डिसेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने वारकरी, दिंडीकऱ्यांची वाहने, अत्यावश्यक वाहने वगळता इतर वाहनांना आळंदीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 02, 2023 | 03:56 PM
कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी; ‘या’ तारखेपासून होणार अंमलबजावणी
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : कार्तिकी एकादशी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा उत्सव यावर्षी ५ डिसेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने लाखो भाविक आळंदीत आगमन करत असतात. ९ डिसेंबर कार्तिकी एकादशी आहे, तर ११ डिसेंबरला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आहे. त्या पार्श्वभूमीवर या कालावधीत वारकरी, दिंडीकऱ्यांची वाहने, अत्यावश्यक वाहने वगळता इतर वाहनांना आळंदीत प्रवेश बंदी करण्यात आली.

आळंदीकडे येणाऱ्या ७ मार्गावर बॅरिकेट नाकाबंदी करण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या वाहनांसाठी प्रशासनाकडून ६ ठिकाणी फोरव्हीलर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनचालकांनी वारी दरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवडवाहतूक शाखेचे उप आयुक्त बापू बांगर यांनी केले आहे.

प्रवेश बंदी करण्यात येणार मार्ग आणि पर्यायी मार्ग

१) मोशी चौक येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रेवश बंदी.

पर्यायी मार्ग – जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्ग, चौविसावाडी/विश्रांतवाडी/भोसरी

२) भारतमाता चौक, मोशी येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी.

पर्यायी मार्ग – जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौकमार्गे चोविसावाडी/ विश्रांतवाडी/ भोसरी. भोसरी चौक-मॅगझीनचौक मार्गे विश्रांतवाडी. मोशी-चाकण ते शिक्रापूर मार्गे.

३) चिंबळीफाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी.

पर्यायी मार्ग – जय गणेश चौक, अलंकापुरम चौक मार्गेचोविसावाडी/विश्रांतवाडी / भोसरी. भोसरी चौक मॅगझीन चौक मार्गे विश्रांतवाडी.

४) आळंदी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी.

पर्यायी मार्गा -जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरमचौक मार्गे चोविसावाडी / विश्रांतवाडी / भोसरी. भोसरी चौक मॅगझीन चौक मार्गे विश्रांतवाडी.

५) चाकण-वडगांव घेणंद मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वहनांना प्रवेश बंदी.

पर्यायी मार्ग – कोयाळी कमान, कोयळी-मरकळगाव मार्गे पुणे

६) मरकळमार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी.

पर्यायी मार्ग – धानोरे फाटा – चऱ्होली फाटा मार्गे भोसरी- विश्रांतवाडी.

७) पुणे-दिघी मॅगझीन चोक मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी.

पर्यायी मार्ग – भोसरी मार्गे-मोशी-चाकण. अलंकापुरम – जयगणेश साम्राज्य चौक मार्गे-चाकण. चऱ्होली फाटा – धानोरी फाटा मार्गे – मरकळ- पुणे.

पार्किंगची व्यवस्था

  • वडगांवकडून येणाऱ्या वाहनांसाठी चांगदेव महाराज विश्रांतवडाजवळी मोकळी जागा. वडगाव रोडवरील नगरपरिषद पार्किंग.
  • चाकण आळंदी फाट्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी इंद्रायणी हाॅस्पिटल समोर.
  • आळंदी तसेच चिंबळी फाट्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी बोपदेव चौकाजवळ मुंगसे पार्किंग.
  • देहूगाव, मोशी, हवालदार वस्ती फाट्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी वहिले पार्किंग व ज्ञानविलास काॅलेज डुडुळगाव, कचरे हाॅस्पिटलसमोर. यासह विविध ठिकाणी शुल्क भरून पार्किंगची व्यवस्थाही असणार आहे.
एसटी बस / पीएमपीएम ठिकाणे
  • सर्व ठिकाणी जाण्यासाठी योगीराज चौक येथील एसटी बसस्टॅड, (फक्त एसटी बस)
  • देहूकडे जाण्यासाठी डुडुळगाव जकात नाका येथे एसटी आणि पीएमपी बस स्टॅंड
  • पुण्याकडे जाण्यासाठी चऱ्होली फाटा येथे एसटीबस आणि पीएमपी स्टॅंड
दिंडीकऱ्यांसाठी वाहन पासची सुविधा

यात्रे दरम्यान आळंदीतून बाहेर जाणारे कामगार वर्ग व आवश्यक कामासाठी स्थानिकांना तसेच दिंडीकऱ्यांच्या वाहनांना आळंदी पोलिस स्टेशन येथे पासची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवार दि.2 पासून पास देण्यात येणार आहेत. पास अर्जासोबत वाहनाच्या कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. दुचाकीसाठी पासची आवश्यकता नाही,अशी माहिती आळंदी पोलीस स्टेशनकडून देण्यातआली आहे.

Web Title: Entry ban for vehicles coming to alandi on the occasion of kartiki yatra nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2023 | 03:56 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Kartiki Yatra
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच
1

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर
2

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर

ZP Election : मित्र पक्षांनी विश्वासात न घेतल्यास स्वबळावर लढण्याचा RPI चा इशारा; चार पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव
3

ZP Election : मित्र पक्षांनी विश्वासात न घेतल्यास स्वबळावर लढण्याचा RPI चा इशारा; चार पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा
4

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.