Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला

भाजपाचे नेते, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या ५० वर्षांच्या सत्तेला शिवसेनेचे आमदार सुहास बाबर सुरुंग लावणार ? याचा फैसला २१ तारखेला होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 04, 2025 | 04:40 PM
सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? 'या' तारखेला होणार फैसला

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? 'या' तारखेला होणार फैसला

Follow Us
Close
Follow Us:
  • सदाशिवराव पाटलांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार ?
  • २१ तारखेला होणार फैसला
  • निकालाकडे सर्वांचं लक्ष
विटा/दीपक पवार : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या विटा नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले. सरासरी ७९ टक्के मतदान झाले. भारतीय जनता पार्टी कडून प्रतिभा चोथे, शिवसेनेतर्फे धनुष्यबाण काजल म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे रोहिणी जंगम यांच्यात लढत होत आहे . परंतु, प्रामुख्याने कमळ आणि धनुष्यबाण यांच्यात जोरदार लढत झाली. भाजपाचे नेते, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या ५० वर्षांच्या सत्तेला शिवसेनेचे आमदार सुहास बाबर सुरुंग लावणार ? याचा फैसला २१ तारखेला होणार आहे. विटा नगरपरिषदेत भाजपाचे कमळ फुलणार की कोमेजणार याकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

विटा हे सुवर्ण शहर म्हणून ओळखले जाते. येथील नगरपरिषदेची निवडणूक कधी नव्हे ती यावेळेस चुरशीने झाली. ५० वर्ष एकाच घराण्याचे वर्चस्व असलेल्या हणमंतराव पाटील यांचे वारसदार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पूर्वाश्रमीचे काॅग्रेस नेते अशोकराव गायकवाड यांनी साथ दिली. आपले पुत्र अजितराव व पुतणे सुमित यांना कमळ चिन्हावर निवडणूकीच्या मैदानात उतरवले. निवडणूकीत आणखीन रंगत वाढली. भाजपाचे प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री, आमदार सुरेख खाडे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली. सदाशिव पाटील गटाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन भ्रमणध्वनी द्वारे मतदारांशी संवाद साधला. पाटील गटातील कार्यकर्त्यांनी बळ देण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर हे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह घेऊन पहिल्यांदाच नगरपरिषद निवडणूकीच्या मैदानात उतरले. प्रारंभी एकटे वाटलेले नंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब मुळीक, आरपीआय कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. अन् बाबर गटात चैतन्य पसरले.‌ बाबर गटाला ताकद देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची विटा शहरात सभा झाली. शिवसैनिकांना ताकद दिली. विटा शहर विकासासाठी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. आमदार सुहास बाबर यांना ताकद देण्यासाठी आवाहन केले.

निवडणूकीच्या प्रचारात आश्वासनांचा पाऊस पडला. पिण्याचे पाणी, भुयारी गटार योजना, औद्योगिक वसाहत, क्रीडांगण, महिलांसाठी शौचालय, हे प्रश्न निवडणूक प्रचाराच्या पटलावर आले. नेतेमंडळींनी पुन्हा आश्वासनाचे नवे गाजर दाखवले. मतदानात वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडते, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

Web Title: Everyones attention is on the results of the vita nagarparishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Election News
  • shivsena

संबंधित बातम्या

दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली
1

दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली

Rahul Gandhi: “भाजप आणि आरएसएस सत्तेचे केंद्रीकरण करतात…”, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
2

Rahul Gandhi: “भाजप आणि आरएसएस सत्तेचे केंद्रीकरण करतात…”, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

जतमध्ये राजकीय घडामोडींना वेग; भाजपला रोखण्यासाठी ‘हे’ पक्ष एकत्र
3

जतमध्ये राजकीय घडामोडींना वेग; भाजपला रोखण्यासाठी ‘हे’ पक्ष एकत्र

फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?
4

फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.