Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिव्यांगांसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राची सुविधा, श्रीकांत शिंदे यांचा मोठा निर्णय

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 17, 2025 | 05:16 PM
दिव्यांगांसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राची सुविधा, श्रीकांत शिंदे यांचा मोठा निर्णय

दिव्यांगांसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राची सुविधा, श्रीकांत शिंदे यांचा मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण: कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यादेखील बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राच्या लोकापर्णाला उपस्थित होत्या. कल्याण डोंबिवली महाालिकेने दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्र सुरु केले आहे. या केंद्राचे लोकार्पण कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.याप्रसंगी भाजप आमदार सुलभा गायकवाड, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, महापालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड आदी मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिकेकडे सुमारे ५५०० दिव्यांग व्यक्तींनी आपली नोंद केलेली आहे. या दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंत महापालिकेमार्फत फिजीओथेरेपीची कोठलेही सुविधा उपलब्ध नव्हती. परंतु आता महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या दिव्यांग आणि मतिमंद व्यक्तींना ही सुविधा विनामुल्य उपलब्ध होणार आहे. केंद्रासाठी महापालिकेने काढलेल्या निविदेला मंजूरी दिली गेली. या कामाचे कार्यादेश आधार रिहॅबिलेटेड सर्विसेस यांना देण्यात आले आहेत.

आशिये – वागदे प्रस्तावित पूल आचरा बायपासला ठरणार दुवा? नेमकं प्रकरण काय ? 


या केंद्रांमध्ये दिव्यांग नागरीक जे अंधत्व, बुटकेपणा, मतिमंद, स्नायु दौर्बल्य, सेरेब्रल पाल्सी, मानसिक आजार, स्वमग्नता ,अध्ययन अक्षमता, थैलेसेमिया, सिकल सेल अनेमिया, वाचादोष, बहुविकलांगता, कर्णबधिरता हिमोफिलीया, लोकोमोटर डिसॅबिलीटी इत्यादी व्याधींनी पिडीत आहेत, अशा दिव्यांग व्यक्तींना या केंद्राच्या माध्यमातुन आरोग्य सुविधा निःशुल्क पुरविण्यात येणार आहेत.

संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवले? मंंत्रिपद स्विकारल्यानंतर दिला नव्हता राजीनामा

याप्रसंगी खासदार शिंदे यांनी सांगितले की, अशा प्रकारचे केंद्र सुरु करणारी कल्याण डोंबिवली महापालिका ही पहिली महापालिका असेल. उल्हासनगरात सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरु करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर कल्याणमध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय डोंबिवलीतील जुन्या सुविधा गृहाच्या जागेत कर्करोग रुग्णालय बांधले जात आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी ५० बेड क्षमता असलेले सुविधा गृह बांधले जाणार आहे. या आरोग्याच्या अद्यावत सोयी सुविधा लवकर कल्याण डोंबिवलीतील नागरीकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरीकांना उपचारासाठी ठाणे, मुंबईला धाव घ्यावी लागणार नाही.कल्याण आणि आसपासच्या परिसरातील दिव्यांग व्यक्तींना योग्य ती आरोग्य सेवा पुरविण्यात यावी या हेतूने या फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचा तुटवडा असल्याने शहर आणि परिसरातील रुग्णांना मुंबईला जाऊन उपाचार घ्यावे लागतात.

Web Title: Facility of physiotherapy and multidisciplinary rehabilitation center for the differently abled srikant shindes major decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Dr Shrikant shinde
  • kalyan
  • kalyan news update
  • thane

संबंधित बातम्या

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..
1

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
2

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
3

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?
4

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.