शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर देखील अनेक आमदार नाराज आहेत. महायुतीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक नेत्यांना संधी देण्यात आली नाही. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे अनेक नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे.
शिंदे गटाचे नेते व आमदार संजय शिरसाट यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे संजय शिरसाट सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र आता संजय शिरसाट यांच्याकडे मंत्रिपद आहे. मंत्रीपद असताना सिडकोच्या अध्यक्षपदी राहता येत नसल्याचा नियम आहे. यामुळे मीडिया रिपोर्टनुसार, संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खाते आहे. मंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे. मात्र मंत्रिपद स्वीकारून महिना उलटून गेला तरी संजय शिरसाट यांनी राजीनामा दिला नव्हता. सिडकोच्या अध्यक्षपदावरुन जोरदार राजकारण रंगले होते. संजय शिरसाट यांनी राजीनामा स्वतःहून न दिल्यामुळे नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनाचे प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूकसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महायुतीच्या नेत्यांची जोरदार तयारी
देशामध्ये सध्या प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचा मोठा उत्साह दिसून येत आहे. जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये करोडो हिंदू साधूंच्या साक्षीने हा महाकुंभमेळा पार पडत आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरु केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आराखडा सादर केला आहे.पुढील सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रामध्ये होणार आहे. महाराष्ट्रामधील नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे हा मेळावा होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केलेला सुमारे 14 हजार कोटींचा प्रारुप आराखडा यावेळी सादर होणार आहे. सिंहस्थ मेळाव्यासाठी अद्याप दोन वर्षांच्या अवधी बाकी आहे. मात्र सुसज्जता आणि नियोजनासाठी आत्तापासून महायुती सरकारने तयारी सुरु केली आहे. 2015 मधील कुंभमेळ्याचा आराखडा सुमारे 2300 कोटींचा होता. आगामी कुंभमेळ्यात त्यामध्ये चार ते पाच वाढ होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने यंदा 6978 कोटींचा आराखडा सादर केला आहे.