Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फडणवीस फेक नॅरेटिव्हचे चालते बोलते केंद्र, अमित शाह तडीपार; सुषमा अंधारेंचे जशास तसे उत्तर

ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग लागले आहेत, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट  देण्याची गरज नाही, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.  उद्योगपती गौतम अदानींच्या विरोधात पत्रकार परिषद घेतल्यामुळे आपली  आर्थिक रसद तुटेल या भितीने औरंगजेब फॅन क्लब सारखी भाषा  करत आहात, यावरूनच तुमचा स्तर किती खाली गेलाय हे समजते.असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 22, 2024 | 02:52 PM
फडणवीस फेक नॅरेटिव्हचे चालते बोलते केंद्र, अमित शाह तडीपार; सुषमा अंधारेंचे जशास तसे उत्तर
Follow Us
Follow Us:

पुणे: गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच जेव्हा ठोकून काढण्याची भाषा करतात तेव्हा ते गृहमंत्री आहेत की ठोकमंत्री  आहेत, हा प्रश्न त्यांनी एकदा स्वत:ला विचारला पाहिजे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असताना जर कुंपणच शेत खात असेल तर दाद कुणाला मागायची, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. रविवारी (21जुलै)  झालेल्या भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

त्यानंतर आज (22 जुलै) पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आरोपांना पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील अधिवेशनात ज्याप्रकारे भूमिका मांडली ते पाहता फडणवीस  हेच फेक नरेटिव्हचे चालते बोलते सर्वात मोठे केंद्र असल्यासारखे वाटतात, असा पलटवारही सुषमा अंधारे यांनी यावेळी केला.

अमित शाहांनी उद्धव ठाकरेंचा ‘औरंगजेब फॅन्स क्लबचे अध्यक्ष’ असा उल्लेख करत टीका केली होती. त्याला उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘आम्हाला अमित शाहांवर काही बोलायचेच नाही. तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. आम्ही कोण आहोत आणि  काय आहोत? याचं प्रमाणपत्र गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याइतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही.’

इतकेच नव्हे तर, ‘ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग लागले आहेत, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट  देण्याची गरज नाही, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.  उद्योगपती गौतम अदानींच्या विरोधात पत्रकार परिषद घेतल्यामुळे आपली  आर्थिक रसद तुटेल या भितीने औरंगजेब फॅन क्लब सारखी भाषा  करत आहात, यावरूनच तुमचा स्तर किती खाली गेलाय हे समजते.’ असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Web Title: Fadnavis center of fake narrative amit shah tadipar answer by sushma andahare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • Amit Shah
  • devendra fadanvis
  • Maharashtra Political News
  • sushma andhare
  • uddhav thackeray news

संबंधित बातम्या

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान
1

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’
2

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक
3

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.