विधानसभेत फडणवीसांची उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर, ठाकरेंचं प्रत्युत्तर
Uddhav Thackeray News: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज विधानपरिषदेचा कार्यकाळ संपला. त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली. या प्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले, “राजकारणात शत्रूता नको, वैचारिक मतभेद असतीलही, पण आम्ही एकत्र येऊ शकतो. उद्धवजी, सत्तेत यायला स्वागत आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘उद्धवजी 2029 पर्यंत तुम्हाला काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, पण तुम्हाला इथं यायचं असेल तर विचार करता येईल. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली. त्यामुळे फडणवीस यांच्या या ऑफरला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधानसभेतील कामकाजानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ऑफरबाबत प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने होत असतात आणि त्या गोष्टी खेळीमेळीनेच घेतल्या पाहिजेत.’ अशी मिश्लिक टिपण्णी करत हा प्रश्न उडवून लावला.
दरम्यान, अंबादास दानवे यांच्या कार्यकाळाचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, “अंबादास दानवे हे मूळचे भाजपच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते आहेत. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारे आणि कट्टर सावरकरवादी कार्यकर्ते म्हणजे दानवे. पण जागावाटपात विधानपरिषदेची जागा शिवसेनेला गेल्यामुळे दानवेंना शिवसेनेत जावं लागलं.’
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानंतर आयोजित करण्यात आलेल्या फोटोसेशनमध्ये एक लक्षवेधी प्रसंग घडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे हे सर्व पहिल्या रांगेत बसले होते.याचवेळी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात आले. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक मुख्यमंत्री शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं. त्यानंतर नीलम गोऱ्हे शिंदे यांच्या शेजारी गेल्या, तर त्यांच्याच शेजारी उद्धव ठाकरे बसले. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे समोर येताच एकनाथ शिंदे यांनी नजर न मिळवता दुसरीकडे पाहिले. हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या लक्षात आला आणि दोन्ही नेत्यांतील अद्यापही टिकून असलेलं राजकीय अंतर पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
इस्रायलचा सीरियाची राजधानी दमास्कसवर भीषण हल्ला, संरक्षण मंत्रालयासह लष्कराचं मुख्यालय उडवलं
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकीय चित्र चर्चेच्या केंद्रस्थानी आले. अनेक दशकांपासून भाजपसोबत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला. खरंतर वाद मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीबाबत होता. शिवसेनेने (अविभाजित) दावा केला होता की युतीमध्ये अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचा करार झाला होता. तथापि, भाजपने हा दावा नाकारला. नंतर युती तुटली आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अविभाजित) सोबत सरकार स्थापन केले आणि पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री झाले.
हे सरकार फक्त अडीच वर्षे टिकले. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले. आमदारांची संख्या कमी झाली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडे बहुमत शिल्लक नव्हते. बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि ते पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री झाले.