(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे, अभिनयामुळे आणि विधानांमुळे चर्चेत असतो. पण यावेळी तो त्याच्या अभिनयामुळे किंवा कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर त्याच्या गायनामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये आमिर खान त्याच्या आवाजाची जादू पसरवताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट सेक्शन हार्ट इमोजी आणि कौतुकाने भरून टाकलं आहे.
आमिर खानने या कार्यक्रमात गायलं गाणं
आमिर खानचा हा व्हिडिओ प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या संगीत अकादमीतील कार्यक्रमातून घेण्यात आला आहे. यामध्ये आमिर कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहे आणि एका गायकासोबत एक गाण्याचा राग गाताना दिसत आहे. अभिनेत्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तसेच अभिनेत्याचं हे हिडन टॅलेन्ट त्यांचं कौतुक देखील होत आहे.
व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
आमिरचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक करण्यास सुरुवर केली. त्याच्या व्हिडिओवर हार्ट इमोजी बनवण्यात आले. याशिवाय, आमिरशी संबंधित आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तो व्हिडीओ कोणती आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
तिन्ही खान एकत्र येत असल्याची अटकळ
दरम्यान, इंटरनेटवर आणखी एका व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये सेटवर तीन व्हॅनिटी व्हॅन उभ्या असल्याचे दिसून येत आहे ज्यावर शाहरुख, सलमान आणि आमिर खानची नावे लिहिलेली आहेत. व्हिडिओ बनवणारी व्यक्ती म्हणते – ‘तिन्ही एकत्र… हा कोणता चित्रपट आहे भाऊ?’. यानंतर, चाहत्यांची दशकांपासूनची अपूर्ण असलेली इच्छा पूर्ण होणार आहे का आणि तिन्ही खान एकत्र स्क्रीन शेअर करतील का, अशी अटकळ वाढली आहे. तसेच, हा व्हिडिओ जुना आहे की नवीन हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात कोण आहे ‘साप’? तान्या मित्तलने केला ‘या’ सदस्याचा पर्दाफाश
आर्यन खानच्या वेब सिरीजमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका?
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान, शाहरुख आणि आमिर खानची झलक शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. अशी चर्चा आहे की शाहरुख स्वतःची भूमिका साकारणार आहे आणि कथावाचकालाही आवाज देणार आहे. सलमान आणि आमिर कॅमिओ भूमिका करताना दिसणार आहेत. या अपडेटनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.