मराठा आंदोलनानंतर मुंबईत झळकले फडणवीसांचे ‘देवाभाऊ’चे बॅनर्स, भाजपकडून कँपेन; शिंदेंची सूचक प्रतिक्रीया
Maratha Reservation: मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या काही प्रमुख मागण्या मान्य केल्या. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी पाच दिवसांचे उपोषण सोडले, आणि त्यानंतर राज्यभरातून आलेले मराठा समाजाचे लोक आपापल्या गावी परतले. पण यानंतर मात्र मुंबईत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकू लागले आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वतंत्र कँपेन सुरू करण्यात आले आहे. मुंबई आणि ठाण्यात ‘देवाभाऊ’ असा उल्लेख असलेले बॅनर झळकले असून, वृत्तपत्रांतही अशा जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या बॅनर्सवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र सूचक प्रतिक्रिया देत, “आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही,” असे वक्तव्य केले.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत राज्य सरकारने तीन महत्त्वाचे जीआर काढले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा उपसमितीमार्फत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर समाधान व्यक्त करत मनोज जरांगे यांनी सरकारचे आभार मानले.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यात ‘देवाभाऊ’ असे संबोधणारे बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करताना दिसतात. बॅनरवर फक्त “देवाभाऊ” असा उल्लेख असून, राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरही अशीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
Environment Special Story: ‘इकोकारी’चा पर्यावरणपूरक प्रवास, वेस्ट पासून बेस्टकडे!
कोणीही निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच… ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,” असाही मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार. ना जातीचा, ना पातीचा, ना भाषेचा… देवाभाऊ,” असेही लिहिले आहे. हे बॅनर नेमके कुणी लावले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, मराठा आरक्षणावरचे जीआर काढल्यानंतर भाजपनेच ही बॅनरबाजी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई आणि ठाण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘देवाभाऊ’ बॅनर लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही. मराठा समाज असो वा ओबीसी समाज, दोघांनाही न्याय देण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे. अडीच वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मिळाली आहे. आता देवेंद्रजी आणि आम्ही, एक टीम म्हणून काम करत आहोत. पुढेही हे काम वेगाने सुरू राहील. सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.”
Maratha Reservation, Manoj Jarange, Devendra Fadnavis, BJP Politics, Mumbai Politics, BMC Elections, Local Body Elections