Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ, शरीरसंबंधांपूर्वीच पतीचे…’; महिलेने केला कोर्टात दावा पण…

पती हा संशयी स्वभावाचा असून, तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. लग्नानंतर एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत आणि पतीचे शरीर संबंधापूर्वीच वीर्यस्खलन होत असे, असेही तिने आपल्या लेखी जबाबात म्हटले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 03, 2025 | 03:54 PM
'पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ, शरीरसंबंधांपूर्वीच पतीचे...'; महिलेने केला कोर्टात दावा पण...

'पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ, शरीरसंबंधांपूर्वीच पतीचे...'; महिलेने केला कोर्टात दावा पण...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचा आरोप करत त्याला सोडून गेलेल्या पत्नीला कौटुंबिक न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी फेटाळत तिला दोन महिन्यांच्या आत पतीच्या घरी परत जाऊन वैवाहिक संबंध पुनर्स्थापित करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश न्यायाधीश घुले यांनी दिला आहे. केवळ आरोप करणे आणि ते कायदेशीररित्या सिद्ध करणे या दोन भिन्न बाबी असल्याचे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.

विजय आणि स्वाती (नावे बदलली आहेत) यांचा विवाह २०२१ मध्ये झाला होता. मात्र, काही काळानंतर स्वाती या पतीचे घर सोडून निघून गेल्या. त्यामुळे विजय यांनी हिंदू विवाह अधिनियमच्या अंतर्गत वैवाहिक नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. पत्नीने कोणताही सबळ कारणाशिवाय आपला त्याग केला असून, तिला परत नांदायला येण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.

पतीच्या याचिकेला उत्तर देताना स्वाती यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. पती हा संशयी स्वभावाचा असून, तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. लग्नानंतर एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत आणि पतीचे शरीर संबंधापूर्वीच वीर्यस्खलन होत असे, असेही तिने आपल्या लेखी जबाबात म्हटले. तसेच पत्नीने दुसर्‍या न्यायालयात विवाह रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केल्याचेही म्हटले. याउलट, पतीने आपल्या याचिकेत आणि पुराव्यात हे सर्व आरोप फेटाळून लावले.

पतीचे म्हणणे नेमकं काय?

आपण शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असून, मधुचंद्रावेळी आणि त्यानंतरही त्यांच्यात आनंदी शारीरिक संबंध होते, असे पतीने ठामपणे सांगितले. संबंधित वकिलाने म्हटले की, हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाह हा एक पवित्र संस्कार आहे. किरकोळ कारणे किंवा सिद्ध न झालेले आरोप यावरून ही महत्त्वपूर्ण संस्था मोडता कामा नये. पती-पत्नीमधील नातेसंबंध टिकवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

कोणताही वैद्यकीय पुरावा नाही

पत्नीने पतीच्या शारीरिक क्षमतेवर आरोप केला असला तरीही कोणताही वैद्यकीय पुरावा दिला नाही. पत्नीच्या म्हणण्यात विसंगती आहे. एकीकडे शारीरिक संबंध झालेच नाहीत, असे सांगितले जाते. तर दुसरीकडे पतीचे लवकर वीर्यस्खलन व्हायचे असे सांगणे, यातून तिच्या दाव्यावर संशय निर्माण होतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Web Title: Family court gives decision regarding woman petition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • Court Decision
  • maharashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
1

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
4

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.