Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली

Jalgaon News: बाजारात भेंडीला अवघा २ रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याने जळू येथील शेतकरी चंद्रसिंग शांताराम पाटील संतप्त झाले. दोन एकर क्षेत्रात भेंडीची लागवड करण्यासाठी मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके, तोडणी आणि वाहतूक असा सुमारे सव्वा ते दीड लाख रुपये खर्च झाला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 05, 2026 | 05:45 PM
Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भेंडीला अवघा २ रुपये प्रतिकिलो दर
  • दोन एकर पिकासाठी दीड लाखांपर्यंत खर्च
  • भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने भेंडी रस्त्यावर फेकली
Bhendi Price Today: शेतात रात्रंदिवस घाम गाळून पिकवलेल्या पिकाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कासोदा बाजारात व्यापाऱ्यांकडून भेंडीला अवघा २ रुपये प्रतिकिलो दर दिला जात असल्याने संतापलेल्या जळू येथील चंद्रसिंग शांताराम पाटील या शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेली संपूर्ण भेंडी चक्क रस्त्यावर फेकून देऊन आपला रोष व्यक्त केला.

दोन एकर क्षेत्रात मोठ्या आशेने भेंडीची लागवड

जळू येथील शेतकरी चंद्रसिंग पाटील यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात मोठ्या आशेने भेंडीची लागवड केली होती. पीक जोमात आल्यानंतर मशागत, नांगरणी, रोटाव्हेटर, बियाणे, लागवड, रासायनिक खते, कीटकनाशक फवारणी, निंदणी, तोडणी मजुरी आणि वाहतूक असा मिळून आतापर्यंत सुमारे सव्वा ते दीड लाख रुपयांचा मोठा खर्च झाला होता. या पिकातून त्यांना सुमारे ७० क्विंटलचे उत्पादन मिळाले.

मात्र, बाजारात नेल्यानंतर व्यापाऱ्यांनी केवळ २ रुपये प्रतिकिलो असा हास्यास्पद भाव दिला. खर्चही वसूल होत नसल्याने, अत्यल्प दरात माल विकण्यापेक्षा संतप्त पाटील यांनी भेंडी रस्त्यावर फेकली. Jalgaon News:

व्यापाऱ्यांनाही परवडेना

या भीषण मंदीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर स्थानिक व्यापाऱ्यांनाही बसत आहे. आम्ही हा शेतमाल मुंबईच्या बाजारपेठेत पाठवतो, परंतु सध्या तेथे मालाला अजिबात उठाव नाही. चांगल्या प्रतीच्या भेडीला मुंबईत अवघा ७ ते ८ रुपये किलो भाव मिळत आहे. काटा खरेदी, हमाली आणि मुंबईपर्यंतचा वाहतूक खर्च गृहीत धरल्यास व्यापाऱ्यांनाही हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे, अशी हतबलता उमरेकर व्यापारी किशोर पाटील यांनी व्यक्त केली.

Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक …

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई द्या

भेंडीच्या दरात झालेल्या प्रचंड घसरणीमुळे एरंडोल परिसरातील शेकडो भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने आणि कृषी विभागाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक भरपाई द्यावी आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य हमीभाव मिळवून द्यावा, अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Jalgaon Crime: घाबरवण्यासाठी केला हवेत गोळीबार; व्हिडिओ काढल्याने …

कांद्याचे भाव थोडे जरी वाढले तरी सर्वत्र ओरड केली जाते आणि महागाईचा डांगोरा पिटला जातो. मात्र, जेव्हा शेतकऱ्याचा माल कवडीमोल भावाने विकला जातो किंवा रस्त्यावर फेकण्याची वेळ येते, तेव्हा कुणीही अवाक्षर काढत नाही. लाखो रुपये खर्च करून पिकवलेला माल रस्त्यावर फेकताना काळजाचे पाणी होते. या दयनीय परिस्थितीची सरकार आणि प्रशासन दखल घेणार का?
चंद्रसिंग शांताराम पाटील, (पीडित शेतकरी, जळू ता. एरंडोल)

Web Title: Farmer throws 70 quintals of okra on road after getting only 2 per kg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन
1

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात
2

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात

Raghav Chadha SIR: राघव चड्ढांचे नाव कटल्यावर संदीप दीक्षित भडकले; BJP अन् AAP वर जोरदार हल्ला!
3

Raghav Chadha SIR: राघव चड्ढांचे नाव कटल्यावर संदीप दीक्षित भडकले; BJP अन् AAP वर जोरदार हल्ला!

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
4

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.