
Farmers suffer financial losses due to increase in fertilizer prices after heavy rains
कांदा, बटाटा, सोयाबीन तसेच इतर भाजीपाला अशा प्रमुख पिकांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हंगामाचा हिशोब जुळवणे कठीण झाल्याची दिसून येते. आता रब्बी हंगाम पुढे येऊन ठेपला आहे. गहू, हरभरा आणि कांदा या पिकांसह इतर पिके घेण्याच्या गडबडीत शेतकरी वर्ग आहे.
या पिकांना खतांची नितांत आवश्यकता असून शासनाने ऐनवेळी पोत्यामागे खतांचे भाव २०० ते ३०० रुपयांचर वाढवले.
येणाऱ्या काळात अजूनही खताच्या दरात वाढ होणार असल्याची माहिती प्राप्त झाली। आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांना विविध कंपन्यांकडून खतांसोबत वॉटर सोल्युबल खते, मायक्रोला आदींची लिकिंग केले जाते.
शेतकऱ्यांकडून या लिंकिंग प्रॉडक्टचा उठाय नसल्याने तो माल इतर खत्तांसोबत शेतक-यांच्या माथी मारला जातो. युरिया खत २६६ रुपयांवर विक्री करू नये असे निर्देश आहेत.
परंतु युरिया वाहतुकीसाठी भाडे देत नसल्याने प्रत्येक पोत्यामागे १० ते २० रुपये ज्यादा दराने दुकानदारांना नाईलाजाने विक्री करावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया दुकानदारांनी दिल्या आहेत.
काळ अन् वेळ दोन्ही सोबतच! देवदर्शनासाठी जाणाऱ्या बसला Uttarakhand मध्ये अपघात; 5 जणांचा मृत्यू तर…
खरे तर युरियाची जादा दराने विक्री झाल्यास शेतकऱ्याकडून देखील ओरड केली जाते. लिंकिंगमुळे दुकानदारांनी मोजक्याच खतांचा उठाव केला आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या दुकानांमध्ये बऱ्याच अंशी युरिया शिल्लक नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
युरिया ऐवजी इतर खताची मात्रा मात्र या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. एकूणच रासायनिक खते आता शेतकऱ्याच्या आवक्याबाहेरचा विषय झाल्याने शेतमालाला या रासायनिक खतांचा मात्रा कसा द्यायचा असा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसुन येते.