उत्तराखंडमध्ये बसला भीषण अपघात (फोटो- ani)
उत्तरखंडच्या टीहरी जिल्ह्यात बसचा अपघात
बसमध्ये प्रवासी करत होते 28 प्रवासी
घटनास्थळी बचावकार्य अत्यंत वेगाने सुरू
Bus Accident Death: उत्तराखंड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उतराखंडमध्ये बसचा अपघात घडला आहे. उत्तराखंड राज्यातील टीहरी राज्यातील नरेंद्रनगर परिसरात आज एका बसला अपघात झाला आहे. या बसमधून एकूण 28 प्रवासी प्रवास करत होते. या दुर्घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
बसमधील प्रवासी गुजरातमधून उत्तराखंडमधील कुंजापुरी मंदिरात दर्शनासाठी आले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत 28 पैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामध्ये अजून काही प्रवाशांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
कुंजापुरी येथे ही प्रवाशांनी भरलेल्या बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट खोल दरीत कोसळली. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा जास्त जखमी झाल्याचे समजते आहे. एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाला आहे. वेगाने बचावकार्य सुरू आहे. जखमी प्रवाशांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवले पुलावरील अपघात रोेखण्यासाठी मोठा निर्णय
पुणे शहर वाहतुक विभाग हद्दीतील कात्रज बाह्यवळण मार्गावरील कात्रज नविन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांच्या वेगामुळे वारंवार होणारे अपघात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यतच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांनसाठी वेग मर्यादा जास्तीत जास्त वेग तीस किमी प्रतितास करण्यात आली आहे. सदरचे आदेश हे दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ पासुन लागू करण्यात येत असल्याचे पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखेचे हिंमत जाधव यांनी एका परिपञकाव्दारे कळविले आहे.
नवले पुलावरील अपघात रोेखण्यासाठी मोठा निर्णय; पोलीस उपायुक्तांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
सदर रस्त्यावरील वाहनांचा वेग मर्यादीत ठेवण्यासाठी, रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण व वाहतुक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन गृह विभाग मोटार वाहन कायदयानुसार पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा पुणे यांनी शहर वाहतुक विभागातील रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका वगळून इतर सर्व वाहनांना आदेश लागू करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले की, चालकांनी आपल्या वाहनाचे स्पीडोमीटर नियमित तपासावे व बोर्डिंग व चिन्हांकडे लक्ष द्यावे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही व स्पीड गन प्रणालीद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.






