Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA ची पुन्हा मोठी कारवाई; कराडातील दोन हॉटेल्सना तात्पुरते बंदचे आदेश

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि पॅकिंगवरील आवश्यक माहिती याबाबत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 06, 2026 | 08:29 AM
FDA ची पुन्हा मोठी कारवाई; कराडातील दोन हॉटेल्सना तात्पुरते बंदचे आदेश

FDA ची पुन्हा मोठी कारवाई; कराडातील दोन हॉटेल्सना तात्पुरते बंदचे आदेश

Follow Us
Follow Us:

कराड : शहरातील हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा नियमांचे पालन होते की नाही, याची अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी अचानक तपासणी केली. या कारवाईत दोन हॉटेल्समध्ये मुदतबाह्य थंड पेयाची विक्री होत असल्याचे आढळून आले, तर काही खाद्यपदार्थ संशयास्पद आढळल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

प्राथमिक तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळलेल्या दोन हॉटेल्सना पुढील आदेश होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्य तीन हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली.

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टलवर कराड शहरातील काही हॉटेल्सविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत सहाय्यक आयुक्त शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर व पथकाने शहरातील संबंधित हॉटेल्सची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आले. दोन हॉटेल्समध्ये मुदतबाह्य थंड पेय आढळून आले.

तसेच काही खाद्यपदार्थ संशयास्पद आढळल्याने त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपासणीच्या निष्कर्षानुसार संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, तासवडे एमआयडीसी परिसरात पॅकिंगवर आवश्यक माहिती नमूद न करता गुळाचे पॅकिंग करून तो अन्यत्र पाठवला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी तपासणी केली. या कारवाईत सुमारे तीन लाख रुपये किमतीचा गूळ सील करण्यात आला.

हॉटेल्समधील तपासणी तसेच तासवडे एमआयडीसीतील गुळावरील कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि पॅकिंगवरील आवश्यक माहिती याबाबत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तालयाच्या भेसळखोरांविरोधातील धडक कारवाईमुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीला मोठा आळा बसत असल्याचे चित्र आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून ब्रँडेड दूध, पॅकबंद पनीर आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ग्राहकांच्या वाढत्या जागरूकतेमुळे हॉटेलांमध्येही अनॉलॉग चीजऐवजी शुद्ध पनीर वापरण्याकडे कल वाढला आहे.

Web Title: Fda conducts another major raid in karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • FDA Action
  • Karad news

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
1

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील
2

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील

पुण्याहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक आग; केबिनने अचानक घेतला पेट अन् क्षणात…
3

पुण्याहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक आग; केबिनने अचानक घेतला पेट अन् क्षणात…

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई
4

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.