पुणे – महाराष्ट्र विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं कर्करोगानं निधन झाल्यानं दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. तर, मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले होते. कसबा पेठ येथून माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवड मतदारसंघांतून लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap)विजयी झाले होते. मात्र या दोन आमदारांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून, त्यामुळे या दोन्ही जागा कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे (BJP) उभे ठाकले आहे. येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दोन्ही जागा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूक (Kasba Constituency) लढवणार नाही, असे आधीच जाहीर केले आहे. तर लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांनी नंतर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे चिंचवडची जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही या पोटनिवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या दोन आमदारांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन्ही जागा कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. येथे होणाऱ्या पोटनिवडणूकीत राजकीय हार होणे भाजपला परवडणारे नाही.
राष्ट्रवादी कसबा पोटनिवडणूक लढवणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेस कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवणार नाही, असे आधीच जाहीर केले आहे. लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांनी नंतर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे चिंचवडची जागा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही त्याला महत्त्व आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर निवडणूक न होता बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जाणार का हे पाहणे म्हत्त्वाचे ठरणार आहे.