मानकापूर परिसरात ढिगाऱ्याला आग; आग वेळीच आटोक्यात आणली म्हणून... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
नागपूर : मानकापूर परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागल्याची घटना सीएनजी पंपाजवळ घडली. आग वेळीच आटोक्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आग सीएनजी पंपापर्यंत पसरली असती तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानकापूर येथील झिंगाबाई टाकळी येथील फरास चौकाजवळ एक रद्दीचे दुकान आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात रद्दी साठवली होती. रद्दीच्या दुकानाजवळ एक सीएनजी पंप आहे. शुक्रवारी सकाळी कचऱ्याच्या डब्यात अचानक आग लागली. सीएनजी पंप जवळच असल्याने परिसरात गोंधळ उडाला. सकाळी 9.21 वाजता अग्निशमन विभागाला भन्नेत्नी माहिती तात्काळ देण्यात आली.
दरम्यान, ही माहिती मिळताच, सुगतनगर अग्निशमन केंद्रातील अग्निशमन दल 4 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. आगीची तीव्रता लक्षात घेता, एकामागून एक एकूण 3 अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली.
कचराकुंडीत आग
कचरा आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आग लागण्याच्या घटना दररोज घडत आहेत. शुक्रवारीही अशीच एक घटना घडली. महालगाव, कापसी येथील पगारिया इंडस्ट्रीयलमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. प्रत्यक्षदर्शीनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.
स्क्रॅप गोदामात भीषण आग
दुसऱ्या एका घटनेत, पिंपरी-चिंचवड परिसरातील देहू-आळंदी रोडवर असलेल्या एका स्क्रॅप गोदामात मध्यरात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. या गोदामात विविध स्क्रॅप साहित्य, प्लास्टिक आणि लोखंडी वस्तू मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे आग जास्त प्रमाणात वाढत गेली असल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.