रोहित शर्माचा विषाखापट्टणममध्ये बिग शो(फोटो-सोशल मीडिया)
Rohit Sharma completes 20,000 runs in international cricket : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना विषाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेने दिलेले २७१ धावांचे लक्ष्य गाठून ९ विकेट्स विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेवर २-१ असा कब्जा केला आहे. या सामन्यात भारता दिग्गज फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे. त्याने विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात रोहितने २०,००० धावा पूर्ण केल्या. या कामगिरीमुळे तो या क्लबमध्ये सामील होणारा चौथा भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी ही कामगिरी फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनाच करता आलेली आहे.
रोहित शर्माने २००७ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. तेव्हापासून, त्याने ५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने प्रतिनिधित्व केले.त्यात खेळून त्याने हा खास टप्पा गाठला आहे. रोहितने तिन्ही स्वरूपात (कसोटी, एकदिवसीय आणि टी२०) उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्याच्या नावावर ५०+ शतके आणि ११०+ अर्धशतके जमा आहेत. जरी त्याने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचा दबदबा कायम आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने ११,४०० पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत. केल्या आहेत.
Welcome to the club of 20K runs and ICC trophy as captain @ImRo45
1.Ponting
2.Rohit
End of the list.. https://t.co/5uIGTaDDWK — JaiBabu❤️🔥 (@unknown_user26_) December 6, 2025
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेयानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत देखील उत्कृष्ट कामगिरी केली. रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ५७ धावांचे अर्धशतक ठोकले आणि २०,००० धावांचा टप्पा गाठण्याच्या जवळ येऊन पोहोचला. रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो फक्त १४ धावा करून बाद झाला, ज्यामुळे त्याला हा विक्रम साधता आला नाही. विशाखापट्टणम येथील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने २७ धावा करत हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७३ चेंडूत ७५ धावा केल्या. यामध्ये त्याने ७ चौकार आणि ३ षटकार ५ ठोकले आहेत.
रोहित शर्माच्या या कामगिरीमुळे त्याने जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. भारतात, फक्त सचिन तेंडुलकर (३४,३५७ धावा), विराट कोहली (२७,८०८+ धावा) आणि राहुल द्रविड (२४,०६४ धावा) त्याच्या पुढे आहेत. हा विक्रम रोहित शर्माच्या वैयक्तिक कारकिर्दीसाठीच नव्हे तर भारतीय क्रिकेटसाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे.






