यवतमाळ: यवतमाळच्या (Yavatmal) आर्णी रोडवरील ममता सुपर बाजार या दुकानाला भीषण आग (Yavatmal Fire) लागली आहे. या दुकानातील किराणा साहित्यासह जनरल साहित्य जळून खाक झालं आहे. दुकान बंद असल्याने दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याचं सांगण्यात आलं आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती मिळाली होती.(Fire News)
[read_also content=”गांधी परिवाराला बेघर करण्याची शिक्षा जनतेने भाजपला दिली, कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर नाना पटोलेंनी मांडलं मत https://www.navarashtra.com/maharashtra/nana-patole-reaction-after-karnataka-election-2023-nrsr-398683.html”]
दरम्यान दुकानाच्या वरील भागात असलेल्या खिडकीतून धूर निघाल्यावर आग लागल्याचं लक्षात आलं. नागरिकांनी अग्नीशमन दलाला फोन करून याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. यामध्ये लाखो रुपयांचे दुकान मालकाचे नुकसान झाले.