Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीमध्ये शर्यतीतील बैलाच्या खरेदीवरून गोळीबार; एकजण गंभीर जखमी

बारामतीमध्ये शर्यतीच्या बैलांच्या खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. या घटनेमध्ये निंबूतमधील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 28, 2024 | 05:18 PM
बारामतीमध्ये शर्यतीच्या बैलांच्या खरेदीविक्रीवरुन गोळीबार

बारामतीमध्ये शर्यतीच्या बैलांच्या खरेदीविक्रीवरुन गोळीबार

Follow Us
Close
Follow Us:

बारामती: बैलगाडी शर्यतीच्या बैलांच्या खरेदीच्या व्यवहारात झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना बारामती तालुक्यातील निंबूत येथे घडली. या घटनेत बैलाचे पुर्वाश्रमीचे मालक रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तालुक्यातील वडगा निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे यांच्यासह इतर तिघांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी निंबूत येथील गौतम काकडे यांनी बैलगाडी शर्यतीतील ट्रिपल महाराष्ट्र केसरी “सुंदर” नावाचा बैल फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्याकडून खरेदी केला होता. बैलाचा व्यवहार 37 लाखांचा करून पाच लाख रुपये विसार देऊन खरेदी केला. उर्वरीत रक्कम 32 लाख रुपये घेण्यासाठी निंबाळकर हे काकडे यांच्या घरी गेले असताना, राहिलेल्या पैशाच्या वादातून काकडे यांनी गोळीबार केला. यात रणजीत निंबाळकर गंभीर जखमी झाले असून त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी निंबाळकर पोलिस ठाण्यात रणजित निंबळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे यांच्यासह इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.

Web Title: Firing over purchase of racing bull in baramati one seriously injured baramati crime case nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2024 | 05:18 PM

Topics:  

  • Baramati Crime News
  • baramati news
  • Baramati News Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.