Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मच्छीमार समाजाने हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले – सुनील तटकरे

खासदार सुनिल तटकरे यांचे रेवदंडा येथे कोळी महासंघाच्या मेळाव्यात प्रतिपादन

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 25, 2024 | 12:35 PM
मच्छीमार समाजाने हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले – सुनील तटकरे
Follow Us
Close
Follow Us:

रेवदंडा : माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला येणार्‍या संकटाला सामोरे जाऊन पुन्हा त्याच ताकदीने उभा राहतो. सर्वाधिक चलन माझा मच्छीमार बांधव मच्छीमार व्यवसायातून देशाला देतो. छत्रपती शिवाजी महाराजाच्या आरमाराचे नेतृत्व करत स्वराज्याचे रक्षण याच कष्टकरी समाजाने केले. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी रेवदंडा येथील कोळी समाज महासंघाच्या मेळाव्यात कृतज्ञता व्यक्‍त केली. मच्छीमार बांधवाना डिझेलचा परतावा यापुढे कधीही थकीत राहणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यावर आणि केंद्रात खासदार म्हणून निवडून गेल्यावर केंद्रसरकारच्या माध्यमातून अनेक योजना मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी राबविल्या जातील असा शब्दही तटकरे यांनी दिला. अलिबाग मतदार संघासाठी जयंत पाटील यांनी जितका निधी आणला नाही त्यापेक्षा तिप्पट निधी आम. महेंद्र दळवी यांनी आणल्याचेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. शेकापक्ष आमदार जयंत पाटील कालच शरद पवार साहेबांना सोबत घेऊन मोर्बा येथे आले होते. पंरतू त्या सभेला गर्दी झाली नाही इतकी गर्दी फक्‍त रेवदंडयात कोळी बांधवानी केली असल्याचा टोला तटकरे यांनी लगावला. यावेळी जयंत पाटील तुम्ही नितिमत्‍ता, राजकारण, अक्‍कल आम्हाला शिकवू नका असे देखील खडेबोल सुनावताच आत्मपरिक्षण करा. तुमचा बालेकिल्‍ला म्हणता मग तुम्ही पिछाडीवर का गेलात? यावर विचार न करता सुनिल तटकरे यांचेवर टिका का करता? असा सवाल तटकरे यांनी केला.

या मतदार संघात 4 जुनला घडयाला गजर ऐकायला मिळेल आणि विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या धनुष्यबाणावर सर्वाधिक मताधिक्य असेल असे सांगतानाच यावेळी पहिल्यांदा घडयाल या चिन्हावर तुम्हाला बटन दाबायचे आहे, उदयाच्या भविष्यात या भागाचे चित्र बदललेले दिसेल असा विश्‍वास तटकरे यांनी व्यक्‍त केला.

रायगडमधील जनमानसात सुनिल तटकरे यांचे स्थान अढळ आहे. त्यामुळे कुणीही कितीही प्रयत्न केला तरी ते निवडून येणारच असा शब्द आमदार महेंद्र दळवी यांनी दिला. कोळी समाज व आगरी बांधव तटकरेच्या पांठिशी उभा राहणार असून त्याचे मतपेटीतून प्रत्यंतर दिसेल असेही दळवी यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार तटकरे यांना निवडून दयायचे आहे. रायगडचा कोळी समाज प्रामाणिकपणे पाठीशी उभा राहील असा शब्द विधान परिषद आमदार रमेश पाटील यांनी दिला. एलईडी पर्सनेट मच्छीमारीमुळे कोळी बांधवावर अन्याय होत आहे. याकडे आमदार रमेश पाटील यांनी लक्ष्य वेधले.

रेवदंडा मोठेबंदर येथील भंडारी समाज सभागृहात कोळी समाज महासंघाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांचे प्रमुख उपस्थितीसह विधान परिषद आमदार आणि कोळी समाज नेते आमदार रमेश पाटील, आमदार महेंद्रशेठ दळवी, अ‍ॅड चेतन पाटील, तालुका अध्यक्ष अनंता गोंधळी, सरपंच प्रफुल्‍ल मोरे, ॠषीकांत भगत, जुलेखा तांडेल, प्रतिक्षा राउत, बाळाशेठ तेलंगे,माजी नगरसेवक प्रकाश बोबडी, कोळी महासंघ रायगड अध्यक्ष ज्ञानेश्‍वर टिवळेकर, कार्याध्यक्ष संजय हवालदार, उपाध्यक्ष ताराचंद कोंडे, रेवदंडा ग्रा.प. उपसरपंच मंदाताई बळी, माणिक बळी,आशिष भट,भगिरथ पाटील,आदी मान्यवर मंडळी व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगिरथ पाटील, कोळी महासंघाचे मनोगत अ‍ॅड चेतन पाटील यांनी व्यक्‍त केले तर आमदार रमेश पाटील, आम. महेंद्रशेठ दळवी व लोकसभा उमेदवार सुनिल तटकरे यांनी उपस्थितांना संबोधीत केले. यावेळी कोळी समाज बांधव व भगिनी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Fishermen community defended hinduvi swarajya sunil tatkare maharashtra political party raigad maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2024 | 12:35 PM

Topics:  

  • Fishermen community
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना
1

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना

Maharashtra Political : रायगड जिल्हा राष्ट्रवादीची धुरा सुधाकर घारेंच्या हाती, शिंदेंच्या विरोधात सुनील तटकरेंची मोठी खेळी
2

Maharashtra Political : रायगड जिल्हा राष्ट्रवादीची धुरा सुधाकर घारेंच्या हाती, शिंदेंच्या विरोधात सुनील तटकरेंची मोठी खेळी

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंची खुर्ची धोक्यात? सुनील तटकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग
3

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंची खुर्ची धोक्यात? सुनील तटकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग

मच्छीमारांना सागरी सीमा ओलांडणं पडलं महागात ; श्रीलंकन नौदलाकडून अटक, बोटीही जप्त
4

मच्छीमारांना सागरी सीमा ओलांडणं पडलं महागात ; श्रीलंकन नौदलाकडून अटक, बोटीही जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.