Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण

मोदी-शहा भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत या भेटींचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी त्यांनी प्रशांत किशोर आणि पक्षातील मतभेदांच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली.

  • By विवेक
Updated On: Aug 07, 2026 | 06:58 PM
मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा

Follow Us
Follow Us:
  • मोदी आणि अमित शाह यांची भेट सदिच्छा भेट असल्याचे तटकरेंचे स्पष्टीकरण
  • मुंबई-गोवा महामार्ग आणि टोलचा मुद्दा गडकरींसमोर मांडल्याची माहिती
  • प्रशांत किशोरांच्या नियुक्तीची माहिती नसल्याचे; पक्षात मतभेद नसल्याचा दावा
 

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या आणि राजकीय समीकरणांच्या चर्चांदरम्यान झालेल्या या भेटींमुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण समोर

पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले की, “संसदेच्या अधिवेशनादरम्यान आपल्या मतदारसंघाशी संबंधित प्रश्न मांडण्याची संधी यावेळी मिळाली नाही. त्यामुळे उपलब्ध वेळेचा उपयोग करून त्यांनी राज्याशी संबंधित विविध विषयांसाठी जवळपास दहा केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. संबंधित विभागांशी चर्चा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न हा या भेटींचा मुख्य उद्देश होता,” हे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीबाबत बोलताना तटकरे यांनी ती केवळ सदिच्छा आणि मार्गदर्शनपर भेट असल्याचे सांगितले. या भेटींना कोणताही वेगळा राजकीय अर्थ लावण्याची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले.

एकनाथ शिंदेंनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट, दिल्लीतून शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीचाही उल्लेख

यावेळी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीचाही उल्लेख केला. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि टोल नाक्यांचा प्रश्न त्यांनी गडकरींसमोर मांडल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या धोरणानुसार 60 किलोमीटर अंतरावर टोल असावा, मात्र कोकणात काही ठिकाणी 40 किलोमीटरच्या अंतरावर टोल आकारला जात असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. या विषयावर गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांच्यावरही केले भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांची नियुक्ती झाल्याच्या चर्चांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अशा कोणत्याही नियुक्तीची माहिती आपल्याला नसल्याचे सांगत, जर असा निर्णय झाला असता तर तो आपल्या माहितीत नक्कीच असता, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील नेतृत्वाबाबत कोणताही मतभेद नसून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय सर्वांनी एकमताने घेतल्याचा दावाही त्यांनी केला.

‘त्यांनी जुनीच कॅसेट पुन्हा वाजवली!’ शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर पुन्हा निशाणा

पक्षातील नाराजीच्या चर्चांवर उत्तर देताना तटकरे म्हणाले की, “आपल्या राजकीय प्रवासाचा अनुभव आणि राज्यभरातील कामाची माहिती लक्षात घेतली तर अशा चर्चांना फारसे महत्त्व नाही. 1985 पासून सुरू झालेल्या आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून राज्यातील राजकारणाची सखोल माहिती आहे,” असे त्यांनी सांगितले.

Web Title: Sunil tatkare clarifies pm modi amit shah meeting ncp politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • Amit Shah
  • narendra modi
  • Nitin Gadkari
  • Prashant Kishore
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक
1

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना
2

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना

Raigad Politics : ‘भरत गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं उचित नाही’; गोगावले – तटकरे भेटीवर महेंद्र दळवी नाराज
3

Raigad Politics : ‘भरत गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं उचित नाही’; गोगावले – तटकरे भेटीवर महेंद्र दळवी नाराज

ना घर, ना स्वतःची गाडी; देशाचे पंतप्रधान Modi यांच्या एकूण संपत्तीचा आकडा किती? जाणून घ्या नेमकी कुठे आहे गुंतवणूक
4

ना घर, ना स्वतःची गाडी; देशाचे पंतप्रधान Modi यांच्या एकूण संपत्तीचा आकडा किती? जाणून घ्या नेमकी कुठे आहे गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.