Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. गोगावले यांनी आजच आपले नाव जाहीर होईल आणि १५ ऑगस्टला आपणच ध्वजारोहण करणार असल्याचा दावा केला.

  • By विवेक
Updated On: Aug 11, 2026 | 08:17 PM
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

Follow Us
Follow Us:
  • रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय आजच होणार असल्याचा भरत गोगावले यांचा दावा.
  • १५ ऑगस्टला पालकमंत्री म्हणून आपणच रायगडमध्ये ध्वजारोहण करणार असल्याचे गोगावले म्हणाले.
  • गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यातील रस्सीखेचमुळे रायगडचे पालकमंत्रिपद दीर्घकाळ रखडले आहे.
 

महायुती सरकारमध्ये गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय ठरलेल्या रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. आज संध्याकाळपर्यंत आपल्या नावाची अधिकृत घोषणा होईल, असे गोगावले यांनी सांगितले.

यंदाच्या १५ ऑगस्टला रायगडमध्ये पालकमंत्री म्हणून आपणच ध्वजारोहण करणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे गोगावले यांच्या वक्तव्यानंतर महायुतीतील या जुन्या वादावर अखेर पडदा पडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भरत गोगावले काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आपले नाव निश्चित झाल्याचे सांगितले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला.

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा

या चर्चेनंतर आज संध्याकाळपर्यंत पालकमंत्री म्हणून आपल्या नावाची घोषणा केली जाईल, असे गोगावले म्हणाले. त्यामुळे त्यांच्या दाव्याची अधिकृत घोषणा कधी होते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

गोगावले विरुद्ध आदिती तटकरे संघर्ष

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले. शिवसेनेकडून भरत गोगावले यांनी या पदासाठी दावा केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांचे नाव पुढे करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मुलगी आदिती तटकरे यांच्यासाठी या पदासाठी प्रयत्न केल्याची चर्चा होती. दुसरीकडे रायगडमधील शिवसेनेच्या आमदारांकडूनही पालकमंत्रिपद शिवसेनेकडेच राहावे, अशी भूमिका मांडण्यात आली होती. या राजकीय संघर्षामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय बराच काळ रखडला.

अनिकेत तटकरेंच्या आमदारकीनंतर समीकरणे बदलली?

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे आमदार झाले. या जागेवर शिवसेनेकडूनही दावा करण्यात आला होता. मात्र वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर शिवसेनेने माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा केल्याचे सांगितले जाते.

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’

या राजकीय तडजोडीच्या बदल्यात रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र आता भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्यामुळे या समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे.

अद्याप पालकमंत्रिपदाबाबत अधिकृत आदेश जारी झालेला नसल्याने अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. गोगावले यांचा दावा खरा ठरल्यास रायगडमधील महायुतीतील दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळू शकतो. त्याचबरोबर रायगडचा निर्णय झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबतही लवकरच तोडगा निघण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Web Title: Bharat gogawale raigad guardian minister post mahayuti dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Mahayuti
  • raigad
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

प्रशांत किशोरांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीत खळबळ; सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरून अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका
1

प्रशांत किशोरांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीत खळबळ; सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरून अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका

Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
2

Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

Raigad News: रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या; विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
3

Raigad News: रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या; विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा
4

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.